एक्स्प्लोर

Husain Dalwai : टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध काय? त्याचा फोटो लावणं चुकीचं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मोठी प्रतिक्रिया

Husain Dalwai On Tipu Sultan : राजकारण करताना त्यामध्ये धर्म कशाला आणता? धर्माचं राजकारण सोडून राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी मांडलं. 

रत्नागिरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानवरुन केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध नसताना त्याचा फोटो दालनात लावणं हे अत्यंत चुकीचं आहे असं हुसेन दलवाई म्हणाले. असं कृत्य करून काही लोक भाजपला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राज्यात टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. आधी मालेगावच्या उपनगराध्यक्षांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला. हिंदुत्वादी संघटना आणि भाजपने विरोध केल्यानंतर तो फोटो काढण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाजारांशी केली. त्यानंतर मात्र या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं दिसून आलं. 

Husain Dalwai On Tipu Sultan : टिपू सुलतानच्या नावाने राजकारण सुरू

या सगळ्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, टिपू सुलतानचा फोटो दालनात लावणे हे अत्यंत चुकीचं आहे. असं कृत्य करून मुस्लिम समाजातली काही मंडळी ही भाजपला मदत करत आहेत. टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध नसताना त्याचा फोटो लावणे चुकीचं आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांचे फोटो लावा.

मालेगावच्या उपमहापौरांना टिपू सुलतान प्रकरणी राजकारण करायचं आहे असा आरोप हुसेन दलवाई यांनी केला. समाजवादी पक्ष जरी इंडिया आघाडीत असला तरी निवडणूक काळात ती धर्मांध पक्षांना मॅनेज झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राजकारण करताना त्यामध्ये धर्म कशाला आणता असा प्रश्न हुसेन दलवाई यांनी विचारला. धर्माचं राजकारण सोडून राज्यातील इतर प्रलंबित प्रश्नावर चर्चा का केली जात नाही असाही प्रश्न दलवाईंनी विचारला. 

Tipu Sultan Photo Controversy : काँग्रस-भाजप आमने सामने

महाराष्ट्रात काँग्रेस विरुद्ध भाजप पुन्हा आमनेसामने आले आणि त्याला निमित्त ठरलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना सपकाळांनी केल्यानंतर भाजप आक्रमक झाला. राज्यभरात भाजपनं आंदोलन करत सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध केला.

भाजप राज्यात हिंदू-मुस्लिम दंगे भडकवत आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. केवळ हिंदू-मुस्लिम वादात ठिणगी टाकायची आणि विषय पेटता ठेवायचा हेच भाजपचं काम असल्याचीही टीका संजय राऊतांनी केली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
लोटे MIDC तील डॉक्टर खान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 कर्मचारी  जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर 
लोटे MIDC तील डॉक्टर खान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 कर्मचारी  जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget