Ratnagiri Accident News :रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर आज सायंकाळी एक भीषण अपघातघडला आहे. नातुनगर धरण परिसरात भरधाव झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं
सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात नातुनगर स्टॉपजवळ घडला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या झायलो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर आदळली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत सबिया मारुख जसनाईक या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक, चार वर्षीय अब्दुल जसनाईक आणि सात वर्षीय सेहरा जसनाईक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धामची मोफत रुग्णवाहिका, जय हिंद ॲम्बुलन्स आणि 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
दरम्यान, अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
नागपूरमध्ये युवकाची हत्या
नागपूरच्या एमआईडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत इसासनी आधार नगरी जवळ अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली. आकाश कृष्णा बरडे असे मयताचे नाव आहे. सुरुवातीला मृतकची ओळख पटत नसल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या भागातील काही कंत्राटदार, मजूर यांना पाठवले. पोलिसांची ही ट्रिक कामी आली. दुपारी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी पल्लवी आली आणि फोटोतील व्यक्ती तिचे पती असल्याचे सांगितले. तिचा पती बुधवारी सायंकाळी घरून बाहेर पडला मात्र रात्री घरी आलाच नाही असे तिने सांगितले. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोधण्यासाठी टीम तयार केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Kej Accident News: भरधाव कारवरचं नियत्रंण सुटलं; कार पलटी होऊन केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ