Ratnagiri Gas Tanker Accident  :रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात (Gas Tanker Accident) झालाआहे. पुलावरून हा टॅंकर खाली कोसळला असून आपघानंतर गॅस टॅंकरमधून लिक झालाय. हिघटना काल (29 जुलै) रात्रीची सुमारासघडली. घटनेचीमाहितीमिळताचअपघातानंतर एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमनेगॅस गळती तात्पुरती थांबविली. सोबतच जवळच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी देखील हलवले. मात्रअद्याप मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प असल्याचेसमोरआलेआहे. परिणामी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यातआल्याआहेत.

मागील सात तासांपासून हामहामार्गवाहतुकीसाठी ठप्प

पुढेआलेल्यामाहितीनुसार, सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीतकरण्याचाप्रयत्नकेलाजातआहे. कारण मागील सात तासांपासून हामहामार्गवाहतुकीसाठी ठप्प आहे. दुसरीकडे मागील दोन महिन्यातील हि दुसरी घटना असल्याचेहिबोललेजातआहे. सध्यापलटी झालेला टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू असून टँकर सरळ झाल्यानंतर गॅस दुसरा टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. तर हातखंबा गावातील वाणी पेठ यापरिसरातील किमान 100 लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीतकरण्यातआलेआहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यापरिसराची पाहणी केलीय. मात्र जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही, असेहीआताबोललेजातआहे.

रस्त्यावरील खड्ड्यामुळेझाला अपघात

मुंबईच्या विरारमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात अपघात होऊन 26 वर्षाचा तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अनिकेत शिंदे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या हाता-पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पूर्व रेल्वे स्थानक ते विरार फाट्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला आहे. वसई विरार नालासोपारा परिसरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच रस्त्यावरून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या