Ratnagiri Gas Tanker Accident : मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकर पलटी, वायूगळतीने घबराट, हायवेवरील वाहतूक ठप्प
Ratnagiri Gas Tanker Accident : रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात (Gas Tanker Accident) झाला आहे.

Ratnagiri Gas Tanker Accident : रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणारा टँकरला अपघात (Gas Tanker Accident) झाला आहे. पुलावरून हा टॅंकर खाली कोसळला असून आपघानंतर गॅस टॅंकरमधून लिक झालाय. हि घटना काल (29 जुलै) रात्रीची सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अपघातानंतर एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने गॅस गळती तात्पुरती थांबविली. सोबतच जवळच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी देखील हलवले. मात्र अद्याप मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प असल्याचे समोर आले आहे. परिणामी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील सात तासांपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प
पुढे आलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण मागील सात तासांपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प आहे. दुसरीकडे मागील दोन महिन्यातील हि दुसरी घटना असल्याचेहि बोलले जात आहे. सध्या पलटी झालेला टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू असून टँकर सरळ झाल्यानंतर गॅस दुसरा टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. तर हातखंबा गावातील वाणी पेठ या परिसरातील किमान 100 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या परिसराची पाहणी केलीय. मात्र जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही, असेही आता बोलले जात आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला अपघात
मुंबईच्या विरारमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात अपघात होऊन 26 वर्षाचा तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अनिकेत शिंदे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या हाता-पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पूर्व रेल्वे स्थानक ते विरार फाट्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला आहे. वसई विरार नालासोपारा परिसरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच रस्त्यावरून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- VIDEO : पोलिसांनीच कोकेन ठेवलं आणि 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं, व्हिडीओ व्हायरल केला; पुणे पोलीस गोत्यात येणार, कायदेशीर बाब सांगत असीम सरोदेंचा दावा
- Pune Crime Rave Party: खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम? कॉल करुन बोलावलं अन् अडकवलं; हॅकरचा सनसनाटी दावा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या






















