Ratan Tata Death: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं काल (9 ऑक्टोबर) निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधानामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. 


रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती?


टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा (Ratan Tata Death) यांनी शिक्षण, आरोग्यसेवा, ग्रामीण विकास आणि आपत्ती निवारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी 1991 मध्ये समूहाची सूत्रे हाती घेतली आणि 2012 पर्यंत ते रतन टाटा कंपनीचे अध्यक्ष राहिले. टाटा समूहाचा व्यवसाय घरच्या किचनपासून ते आकाशातील विमानांपर्यंत विस्तारला आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये रतन टाटा यांची एकूण संपत्ती 3800 कोटी रुपये होती. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियन रिच लिस्टमध्ये रतन टाटा 421 व्या क्रमांकावर होते. टाटा समूहाकडे 100 हून अधिक सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्या आहेत, ज्यांची एकूण उलाढाल सुमारे $300 अब्ज आहे. रतन टाटा आपल्या कमाई बहुतांशी चॅरिटीसाठी दान करायचे. टाटा समूहाचे नेतृत्व करताना रतन टाटा यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. 


रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण?


रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा समुहाचा उद्योग कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत आता नोएल टाटा यांचे नाव आले आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांना माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा अशी तीन मुले आहेत. हे तिघेही टाटा कंपनीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. या तिघांपैकी एकालाच टाटा समूहाचा उत्तराधिकारी बनवले जाईल, असे मानले जात आहे.


नफा - तोटा न पाहणारा उद्योगपती-


रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर टाटा समूहाला नव्या उंचीवर नेऊन देश आणि जगात मोठे नाव कमावणारे व्यक्तिमत्त्व होते. इतकं सगळं असूनही ते नेहमी जमिनीशी जोडलेले राहिले. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा - तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं करता येईल यासाठी रतन टाटा नेहमीच प्रयत्नशील असायचे. व्यावसाय करताना समाजाचा विसर पडता कामा नये, असं ते नेहमी सांगायचे.


संबंधित बातमी:


Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला, संपूर्ण देश हळहळला!