नवी दिल्ली: 'एबीपी माझा'चे पत्रकार गणेश ठाकूर यांना रामनाथ गोएंका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या एका सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

'ऑपरेशन संमोहन' या विषयावरील शोध पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबरोबरच एबीपी न्यूजचे प्रतिनिधी संजय नंदन यांना देखील रामनाथ गोयंका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांना ‘एक्सिलेंस इन हिन्दी जर्नलिझम’ यासाठी पुरस्कार देण्यात आला.

एबीपी न्यूजचा स्पेशल शो ‘रामराज्य’चे प्रोड्यूसर संजय नंदन यांना यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं.