Rajiv Deshmukh Passes Away : चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (Rajiv Deshmukh Passes Away) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव (Chalisgaon) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आज चाळीसगाव शहरात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता. राजगड बंगल्याबाहेर हजारो नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री अनिल पाटील, गुलाबराव देवकर, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी-माजी आमदार उपस्थित होते. दरम्यान, अंत्यदर्शनावेळी मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) हे भावुक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त
Dr. Satish Patil : शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणारा नेता गेल्याचे दुःख
चाळीसगावला येऊन राजीव देशमुख यांना श्रद्धांजली द्यावी लागेल, असं कधीही वाटलं नव्हतं. राजीव देशमुख एक कर्तव्यदक्ष माणूस होते. त्यांनी शहरालाच नव्हे तर तालुक्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. कैलासवासी अनिल देशमुख यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याची क्षमता त्यांच्यात होती. प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू आहे, एक चांगला नेता, कार्यकर्ता गेल्याचं दुःख आम्हाला आहे. शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणारा नेता गेल्याचे दुःख आम्हाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिलीय.
Anil Patil : कधीही न भरून निघणारी हि दुःखद घटना
कधीही न भरून निघणारी हि दुःखद घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. राजीव देशमुख यांची एक परंपरा होती, कार्यकर्त्यांना जोपासणे हा त्यांचा स्वभाव होता. माजी आमदार जरी असले तरी कार्यकर्ता म्हणून ते वावरायचे.असा कार्यकर्ता जळगाव जिल्ह्यातून जाणं हि राजकीयदृष्टया मोठी हानी आहे. ही हानी कधीही भरून निघणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या