एक्स्प्लोर

Raigad : पळस्पे–कोन पंचायत समिती गणात भाजपचा दबदबा; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तीनही उमेदवार विजयी

Panvel Palaspe Election : पळस्पे जिल्हा परिषदेतून भाजपचे राजेंद्र पाटील तर पंचायत समिती गणातून हर्षदा घरत आणि योगिता लहाने यांनी विजय मिळवला आहे. 

नवी मुंबई : पनवेल–पळस्पे–कोन पंचायत समिती गणातून भाजपच्या हर्षदा अतुल घरत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. घरत यांनी शेकापच्या अस्मिता ढवळे यांच्यावर ६,८२९ मतांनी विजय मिळवला. हा निकाल जाहीर होताच पळस्पे–कोन परिसरात भाजप समर्थकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पळस्पे–कोन परिसरात भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. पळस्पे–कोन पंचायत समिती गणासह जिल्हा परिषद गट व अन्य पंचायत समिती गणांमध्ये भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

पळस्पे–कोन पंचायत समिती गणातून हर्षदा अतुल घरत यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. त्यांना १६,०२४ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला ९,१९५ मते मिळाली. ४०३ मते ‘नोटा’च्या पारड्यात गेली. एकूण २५,६२२ वैध मते नोंदवण्यात आली.

कोन पंचायत समिती गणातून भाजपच्या योगिता योगेश लहाने यांनी विजय मिळवला. त्यांना ६,२५६ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार ५,१०४ मतांवर समाधान मानावे लागले. या गणात १५० मते नोटाला पडली. एकूण ११,५१० वैध मते नोंदवली गेली.

पळस्पे जिल्हा परिषद गट क्रमांक ४ मधून राजेंद्र हरिश्चंद्र पाटील (भाजप) यांनी विजय मिळवला. त्यांना ८,४६० मते मिळाली. शिवसेना उमेदवाराला ४,६८९ मते, तर अन्य उमेदवाराला ७१४ मते मिळाली. २५० मते नोटाला पडली. एकूण १४,११३ वैध मते नोंदवण्यात आली.

तीनही ठिकाणी विजयाची घोषणा होताच पळस्पे–कोन परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

हर्षदा अतुल घरत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा विजय एखाद्या व्यक्तीचा नसून जनतेच्या विश्वासाचा आहे. दिलेला कौल विकासकामांद्वारे प्रामाणिकपणे पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर त्यांचे पती आणि वाहतूक संघटना अध्यक्ष अतुल मारुती घरत यांनीही सर्व मतदार, कार्यकर्ते व हितचिंतकांचे आभार मानत, येत्या काळात विकासाभिमुख व लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.या निकालामुळे पळस्पे–कोन परिसरात विकासाच्या नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून स्थानिक प्रश्नांना गती मिळेल, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा:

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Alibag Accident : नमाजला जाताना 21 जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला, एकाचा मृत्यू, 20 जखमी, भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
नमाजला जाताना 21 जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला, एकाचा मृत्यू, 20 जखमी, भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Raigad Crime News: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Embed widget