(Source: ECI | ABP NEWS)
खोपोलीजवळच्या बोरघाटात भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Raigad Accident News : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले. या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली. तर चौघे जखमी झाले आहेत.
जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू
जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशन सह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघातामध्ये महिलांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
बस आणि दुचाकीच्या अपघातात झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक आणि 3 वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात आज दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.
उदगीरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस आणि दुचाकीची हानेगाव जवळील औराद वझर कॉर्नरवर समोरासमोर धडक झाली. दुचाकीवर तीन जणांसोबत एक तीन वर्षाची चिमुकली होती. दुचाकी थेट एस टी बसखाली अडकल्याने दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमीना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान 70 आणि 75 वर्षीय दोन वृद्धाचा मृत्यू झाला. दुचाकीचालक आणि तीन वर्षाची चिमुकली बचावली आहे.
दिवसेंदिवस राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय
दरम्यान, दिवसेंदिवस राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अपघात होण्याची निरनिराळी कारणं देखील समोर आले आहेत. अनेकदा रस्त्यांच्या अडचणी असतात, तर काही ठिकाणी गर्दीचा विषय असतो. अनेकदा चालकाच्या निष्काळजीपणामुळं देखील मोठे अपघात होत आहेत. अशा अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळं वाहन चालवताना प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. अपघात टाळण्यासाठी आपलं वाहनं योग्य पद्धचीनं चावले पाहिजे, नाहीतर धोका होण्याची दाट शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या:
























