Raigad News : रायगड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अलिबाग शहरात जागोजागी पाणी साचले आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

Continues below advertisement

पीएनपी नगर या भागात रस्त्यांवर पाणी आल्याने पादचारी आणि वाहनचालकांना वाट काढणे कठीण झाले आहे. शहरातील तळकर नगर भागात देखील पावसाचे पाणी शिरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अलिबाग नगरपालिकेचा ढिसाळ कारभार यावरून उघडकीस आला आहे. 

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाचा मोठा दणका शहारतील नागरिकांना बसला आहे. पावसामुळं शहरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अनंत आईस फॅक्टरी, मच्छी मार्केट परिसरात गटारे तुंबल्यामुळं रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नाईक कंपनी परिसरात वाशिष्टी नदीच्या पुराचे पाणी साचले आहे. 

Continues below advertisement

विस्कळीत झालेल्या वाहतूक संदर्भातील जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचे अपडेट 

रायगड जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या वाहतूक संदर्भातील जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचे अपडेट आले आहे.   पर्जन्यवृष्टीमुळं NH 66 मुंबई गोवा हायवेवर वाकन फाटा, सुकेळी खिंड या ठिकाणी रस्त्यावर जवळजवळ अर्धा किलोमीटरवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं, तसेच रोहा अलिबाग रोडवर भिसे खिंड येथे दरड कोसळल्यामुळे गोव्याकडे जाणारे वाहनचालक किंवा गोव्यावरून मुंबईकडे  येणारे वाहन चालक यांनी एक्सप्रेस वे चा वापर करावा.

पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे

1)मुंबईहून गोव्यासाठी जाताना एक्सप्रेस वे -पुणे -तामिनी घाट- निजामपूर नाका माणगाव पुढे NH 66 गोव्याकडे 2)गोव्याकडून मुंबईकडे येताना माणगाव- निजामपूर नाका -तामीनी घाट -पुणे -एक्सप्रेस वे मार्गे मुंबई.

वसईत मुसळधार पावसात सोसायटीची कंपाउंड भिंत कोसळली; 15दुचाकींचे मोठे नुकसान

वसईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चालू इमारतीची कंपाउंड भिंत आज दुपारी अचानक सोसायटीच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या 15 दुचाकीवर कोसळल्याची घटना घडली.  भिंतीलगत उभ्या असलेल्या या दुचाकी भिंतीखाली दबल्या गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटना फादरवाडी येथील श्रीपाल वन या सोसायटीत घडली आहे. सुदैवाने, घटना घडली त्यावेळी परिसरात कोणतीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली. मात्र भिंत कोसळताच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असू, सोसायटीतील रहिवाशांनी वंडर पार्क च्या बिल्डरावर कुमकुवत कंम्पाऊड वॅाल बनवल्याची तक्रार केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बिल्डराने आता हात वर केले असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.