Raigad Mumbai Goa Highway News :रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. भेगा पडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथील पुलावर टाकलेल्या काँक्रिट स्लॅब मधील गॅप वाढत असल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर पुल बंद करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

सर्व्हिस रोडवरुन वाहतूक वळवण्यात आली 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार  मुंबई गोवा महामार्गावरील या पुलावरील गॅप चार दिवसां पासून वाढत चालला होता. त्यामुळं बांधकाम महामार्ग विभागावर या महामार्गावरील पुल बंद करण्याची नामुष्की आली आहे. सद्यस्थिती मध्ये सर्व्हिस रोडवरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर अपघात, टायर फुटल्याने कार कंटेनरला धडकली, प्रवाशी थोडक्यात बचावले

मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. कारचे पुढील टायर फुटल्याने कार थेट फिरुन कंटेनेला धडकली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे रामनगर इथं ही घटना घडली आहे. अपघातात कार मधील सर्व प्रवाशी थोडक्यात बचावले. मुंबईकडून कोकणाच्या दिशेकडे येत असताना हा अपघात घडला आहे. 

Continues below advertisement