Maharashtra Politics: शिंदे गटाच्या आमदाराच्या अडचणी वाढणार? अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव, विजयाला दिलं आव्हान
Mahendra Thorve: रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

रायगड: रायगड जिल्ह्यातील कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार सुधाकर घारे यांनी थोरवे (Mahendra Thorve) यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी थोरवे यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्यावर भ्रष्ट पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. कारण आमदार थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच ही याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
सुधाकर घारे यांनी आपल्या याचिकेत, थोरवे (Mahendra Thorve) यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार आणि डमी उमेदवार उभे करून निसटता विजय मिळवला. यासंदर्भात पुरावे सादर करत घारे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली असून, यामुळे थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर प्रश्न उभा राहिला आहे. जर याचिकेवर पुढील निर्णय थोरवे (Mahendra Thorve) यांच्या विरोधात गेला, तर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यांनंतर हायकोर्टाने हे पुरावे योग्य असल्याचं मान्य केलं आहे. यामुळे थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्याविरोधात महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीच्या व भ्रष्ट पद्धतीने निवडणूक मध्ये निसटता विजय मिळविला आहे, महेंद्र थोरवे यांचा हा विजय कर्जत खालापूर मधील जनतेला मान्य नाही. महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्याकडून खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, दादागिरी, डमी उमेदवार याबाबतचे सर्व पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी हायकोर्ट मध्ये दाखल केले होते. त्यांनंतर आता हायकोर्ट मध्ये हे पुरावे तपासून योग्य असल्याचे मान्य करून हायकोर्ट मध्ये याबाबत याचिका दाखल करून घेण्यात आलेली आहे. यामुळे आता आमदार थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
