रायगड:शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता आणखी एका मंत्र्याचं प्रकरण समोर आलं आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

या आधी ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांसह व्हिडीओ समोर आणला होता. ते प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावलेंचाही व्हिडीओ समोर आला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडओ व्हायरल झाला, त्यांनी '50 खोके’ म्हटलं तर कॅशबम्ब वाल्यांची बायको माझ्यावर धावत आली. आता त्यांच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असं चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

Raigad Shivsena Vs NCP : रायगडचं वातावरण तापलं

ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बमुळे रायगडचं राजकारण चांगलंच पेटल्याचं दिसतंय. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षात या व्हिडीओमुळे नवी ठिगणी पडली. शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे विरुद्ध राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अशी जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

यामध्ये संत आणि देशभक्तांवरुन एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली. दळवी निरागस आहेत, ते देशभक्त असल्याचा उपरोधिक टोला तटकरेंनी लगावला. दळवींच्या व्हिडीओची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी तटकरेंनी केली. तर तटकरे राजकारणातील संत आहेत असा प्रतिटोला दळवींनी लगावला. तसंच अंबादास दानवेंना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अंबादास दानवेंनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बमध्ये महेंद्र दळवी दिसत आहेत. त्यामध्ये नोटांच्या बंडलांसहित एक लाल टी शर्ट वालाही इसम दिसतोय. मात्र, हा इसम नेमका कोण आहे याबाबत स्पष्टता नाही. या व्हिडीओमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरश महापूर आल्याचं दिसतंय.

ही बातमी वाचा: