एक्स्प्लोर

Bharat Gogawale : माझ्याकडे पैसे असते तर मुंबईत घर घेतलं असतं; कॅश बॉम्ब व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

Bharat Gogawale Cash Bomb : शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह एक व्हिडीओ समोर आणला. त्यावर आपल्याकडे इतके पैसे नसल्याचं गोगावले म्हणाले.

नागपूर : नोटांच्या बंडलांसह व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी (Bharat Gogawale Video) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे एवढा पैसा असता तर मी मुंबईत घर घेतलं असतं, गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपल्यावर एकही ओरखडा नाही असं भरत गोगावले म्हणाले. चित्रलेखा पाटील (Chitralekha Patil) यांनी केलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावी, आपण कोणत्याची चौकशीसाठी तयार असल्याचंही गोगावले म्हणाले.

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह एक व्हिडीओ शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला. गोगावलेंकडून एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.

Bharat Gogawale Cash Bomb Video : आरोपांची चौकशी व्हावी

चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की, "चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावी. एवढा पैसा असता तर मी मुंबईत घर घेतलं असतं. अजूनही माझं मुंबईत घर नाही. असे आरोप होत राहणार, विरोधक आहेत ते. मात्र त्यांनी केलेल्या आरोपाचा पुरावा द्यावा, अन्यथा मलाही कायदेशीर नोटीस बजावावी लागेल."

चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या आरोपांमागे कुणाचा हात आहे, तटकरे की आणखी कुणाचा हात आहे हे आताच सांगता येणार नाही असं भरत गोगावले म्हणाले. या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, मग त्यावर उत्तर देईन असं भरत गोगावले म्हणाले.

जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे, 40 वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर आरोपांचा एक ओरखडाही नाही. चिटर असतो तर लोकांनी 8 वेळा निवडून दिलं नसतं असं भरत गोगावले म्हणाले. परवाच्या बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढायच ठरलं आहे. आम्ही युतीधर्म पाळला,ज्यांनी नाही पाळला त्यांना कळेल. समझने वाले को इशारा काफी आहे असं भरत गोगावले म्हणाले.

Raigad Shivsena Vs NCP : रायगडचं वातावरण तापलं

ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बमुळे, तसेच चित्रलेखा पाटील यांनी समोर आणलेल्या भरत गोगावलेंच्या व्हिडीओवरुन रायगडचं राजकारण चांगलंच पेटल्याचं दिसतंय. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षात या व्हिडीओमुळे नवी ठिगणी पडली. शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे विरुद्ध राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अशी जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

यामध्ये संत आणि देशभक्तांवरुन एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली. दळवी निरागस आहेत, ते देशभक्त असल्याचा उपरोधिक टोला तटकरेंनी लगावला. दळवींच्या व्हिडीओची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी तटकरेंनी केली. तर तटकरे राजकारणातील संत आहेत असा प्रतिटोला दळवींनी लगावला. तसंच अंबादास दानवेंना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अंबादास दानवेंनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बमध्ये महेंद्र दळवी दिसत आहेत. त्यामध्ये नोटांच्या बंडलांसहित एक लाल टी शर्ट वालाही इसम दिसतोय. मात्र, हा इसम नेमका कोण आहे याबाबत स्पष्टता नाही. या व्हिडीओमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरश महापूर आल्याचं दिसतंय.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget