एक्स्प्लोर

Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी

नार्वेकर यांच्या कुटुंबाच्या नावावर 60 एकरहून अधिक जमीन अलिबागमध्ये असल्याचं उघडकीस आलं आहे. सोगाव, झिराड,किहीम, मांडवा, म्हात्रोळी , धोकवडे, मापगाव अलिबाग मांडवा रोड अशा भागात जमीन खरेदी केली आहे. 

Rahul Narvekar Land in Alibag: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चार दिवसांपूर्वी अलिबाग येथील म्हात्रोळ गावात एका जमीन मोजणी प्रकरणात शेतकऱ्याची फसवणूक प्रकरणी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार  टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर चर्चेत आलेत. नार्वेकर यांच्या कुटुंबाच्या नावावर चक्क 60 एकरहून अधिक जमीन अलिबागमध्ये असल्याचं उघडकीस आलं आहे. अलिबागमधील सोगाव, झिराड,किहीम, मांडवा, म्हात्रोळी , धोकवडे, मापगाव अलिबाग मांडवा रोड अशा भागात जमीन खरेदी केली आहे. 

मालमत्ता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

राहुल नार्वेकर यांनी भाऊ मकरंद नार्वेकर आणि पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या नावावर या जमिनी खरेदी केल्या आहेतं. एवढेच नाही तर सन  2020/23 या कालावधीमध्ये ज्यांच्या प्राप्तीकर विवरण पत्रात काही हजारो रुपयांच उत्पन्न दाखवणाऱ्या नार्वेकर यांच्या पत्नीच्या उत्पन्नात मात्र सन 2024/25 नंतर अचानक 9 लाखांचे उत्पन्न वाढल्याच दिसून येत आहे. त्यामुळे नार्वेकर यांनी अलिबागमध्ये आपल्या परिवाराच्या नावावर घेतलेल्या या जमिनी आणि ही संपूर्ण मालमत्ता आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष झाल्यापासून जास्त मोठ्या प्रमाणात जमिनी जागा खरेदी केल्याचं बोलल जात आहे. 

अर्ज माघार घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप

दुसरीकडे, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर पुन्हा एकदा चर्चेत आले. विरोधी उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच माजी खासदारांच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांना तातडीचे आदेश देतानाचे दृश्यही समोर आले होते. या दोन्ही घटनांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आणखी एक व्हिडिओ समोर आला. जमीन मोजणीच्या कामासाठी गेलेल्या राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिक दाम्पत्याने जाब विचारत आक्रमक भूमिका घेतल्याचे या व्हिडिओत दिसते.

“आम्ही घरात नसताना आत कसे शिरलात?” 

व्हिडिओ शेअर करताना संजय राऊत यांनी, “विधानसभा अध्यक्षांसोबत ही घटना नेमकी कुठे आणि का घडली?” असा सवाल उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकासमोर एक दाम्पत्य संतप्तपणे बोलताना दिसते. “आम्ही घरात नसताना आत कसे शिरलात?” असा सवाल करत महिला आक्रमक पवित्र्यात जाब विचारताना दिसते. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच राहुल नार्वेकर मागे सरकताना आणि मान खाली घालून निघून जाताना दिसतात. त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महिलेची वादावादी सुरू असतानाच ‘व्हिडिओ करा’ असा आवाजही ऐकू येतो. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी अंगलट येताच वाद टाळण्याचा प्रयत्न करत “भांडण करू नका” असे सांगितल्याचेही व्हिडिओत दिसते. मात्र जमीन मोजणीच्या मुद्द्यावरून संबंधित दाम्पत्याचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना पाहायला मिळतो. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Embed widget