Ambenali Ghat Scorpio Accident: रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने (Ambenali Ghat Scorpio Accident) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपुर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. सदर स्कॉर्पिओ सुमारे 1000 ते 1500 फुट खोल दरीत कोसळली या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.
आंबेनळी घाटातील अपघाताची थरारक कारणे- (Ambenali Ghat Scorpio Accident)
सदर अपघाताबाबतची थरारक कारणे समोर आली आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटातील अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पहाटे झालेल्या स्कॉर्पिओ अपघात स्थळावर भरधाव वेगात आणि नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. मात्र ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी संरक्षित कठडे नसून केवळ मातीचा ढीग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असल्याने स्कॉर्पिओ गाडी मातीवर चढून खाली कोसळली आणि या अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासन या बाबतीत किती गंभीर आहे, यावरून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Ambenali Ghat Scorpio Accident)
7 जणांची 5 पथके तयार, मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर- (Ambenali Ghat Scorpio Accident)
जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी 7 जणांची 5 पथके तयार केली आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लवकरच उर्वरित मृतदेह बाहेर काढले जातील. यात एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. इतर स्वयंसेवी बचाव पथकेसुद्धा मदत करीत आहेत. मृतांपैकी 1 रत्नागिरी जिल्ह्यातील असून उर्वरित 7 हे सातारा जिल्ह्यातील आहेत. रायगड आणि सातारा पोलीस दल सुद्धा समन्वय ठेवून आहेत.
अपघातात 8 जणांचा मृत्यू, नावे आली समोर- (Ambenali Ghat Scorpio Accident)
1) रितेश राजेंद्र लोखंडे वय 25 वर्षे (मृतदेह सापडला)2) महेश अनिल पवार वय 25 वर्षे3) आदित्य अशोक साळुंखे वय वर्षे 214) सुहास जितेंद्र लोखंडे वय 20 वर्षे5) अंश समीर चव्हाण वय 18 (मृतदेह सापडला)6) उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21 वर्षे7) अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25 वर्षे8) नितीन किसन नायकोंडे वय 35 वर्षे
आंबेनळी घाटात नेमकं काय घडलं? (Ambenali Ghat Scorpio Accident)
स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल (24 मे) रात्री घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जिपने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार आणि दरीची खोली जास्त असल्याने अपघाताची भीषणता प्रचंड होती. याचदरम्यान, अपघात झालेल्या स्कॉर्पिओ गाडीचा पहिला फोटोही समोर आला आहे. पूर्णपणे स्कॉर्पिओचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. तसेच स्कॉर्पिओच्या 5 फुटांच्या अंतरावर 4 मृतदेह पडले होते.
