Raigad News: कर्जतमधील पळसदरी तलावात एका विद्यार्थी बुडाल्याची घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ खारघर या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन्सच्या पहिल्या वर्षात हा विद्यार्थी शिकत होता.
नेमकं काय घडलं? (Raigad News)
आर्यन थापर असं या विद्यार्थ्याचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. आपल्या कॉलेजच्या पाच मित्रांसोबत लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेसाठी पळसदरी येथे आला होता. मात्र भर दुपारी उष्णतेत वाढ होत असताना जवळच डॅम असल्याने आर्यनने डॅमच्या पाण्यात पोहण्याचा प्लॅन केला. मात्र आर्यनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो या तलावात बुडाला.
आज सकाळी सापडला मृतदेह- (Raigad News)
कर्जत पोलिसांनी खोपोली येथील हेल्प फॉउंडेशनच्या माध्यमातून बचाव आणि शोधकार्य राबवले. मात्र काल संध्याकाळी उशीरापर्यंत आर्यनचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर आज त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव टीम ना यश आले आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत असून उन्हाळी पर्यटनासाठी धरण आणि नद्यांवर जात असताना सावधगीरी बाळगण्याचे अवाहन या निमित्ताने रायगड प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
