Raigad Teen Girl Ends Life At Home: फेसबुकवर मैत्री आणि  तरुणासोबत मोबाईल फोनवर बोलत असताना घरच्यांनी रंगेहाथ पकडलं, याच भीतीपोटी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं (Crime News) घरातच आयुष्य संपवलं. ही भयंकर घटना रायगड जिल्ह्यातील  म्हसळा तालुक्यातील वरवठणे (Raigad Crime) गावातील बौद्धवाडी परिसरात घडली आहे.  राहत्या घरात  शाळकरी मुलीनं गळफास घेतल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र,  डॉक्टरांनी तपासून अल्पवयीन मुलीला मृत घोषित केले.   या घटनेनंतर पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.  मुलीच्या निधनाची बातमी कुटुंबात पसरताच, त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Continues below advertisement

फेसबुकवर मित्राशी बोलत असताना घरच्यांनी रंगेहाथ पकडलं

15 वर्षीय मृत अल्पवयीन मुलगी ही रायगडच्या म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावातील बौद्धवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  दोन महिन्यांपूर्वी शाळकरी मुलीनं फेसबुकवर एका मुलाशी मैत्री केली होती. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं होतं.   शुक्रवारी उशिरा रात्री मुलगी त्या मुलासोबत बोलत होती. यादरम्यान, मुलीच्या घरच्यांनी तिला रंगेहाथ पकडली.  घरच्यांना ही बाब समजताच मुलगी घाबरली. घरचे आपल्याला ओरडतील किंवा मारतील,  या भीतीनं तिच्या मनात घर तयार केलं होतं.   

भीतीपोटी अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

घटनेच्या दिवशी मुलीनं स्वत:च्या  घरातील लाकडी वस्तूला साडी बांधली. तसेच गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. मुलीच्या कुटुंबाला याची माहिती मिळताच त्यांनी मुलीचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. तिला तातडीने उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान,  मुलीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.  या घटनेची माहिती मिळताच म्हसळा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.  तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे करीत असल्याची माहिती आहे.  दरम्यान, या घटनेनंतर वरवठणे गावातील बौद्धवाडी येथे खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Amravati Crime: जंगलात तरुणीवर अत्याचार, मित्रालाही काळ-निळं होईपर्यंत मारहाण; 5 नराधमांची ओळख पटली, अमरावतीत संताप

संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक