Raigad Crime News : रायगडच्या रोहा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका आजीने आपल्या नातवासहीत एका बिल्डिंग वरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेत आजीचा जागीच तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रोहा मधील ओम चेंबर बिल्डिंग मधील हे दोघंही रहिवासी असून उर्मीला सिद्धाराम कोरे (वय वर्ष 52) अस उडी मारणाऱ्या महिलेच नाव आहे. तीने तिच्या 2 वर्षाच्या आपल्या नातवा सहित आज सकाळी 6:30 च्या दरम्यान राहत्या बिल्डिंगच्या टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारणं अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
10 वर्षीय मुलीवर 32 वर्षीय रिक्षा चालकांकडून अत्याचार
दरम्यान अशीच एक खळबळजनक घटना मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातून समोर आली आहे. यात 10 वर्षीय मुलीवर एका 32 वर्षीय रिक्षा चालकांनी अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. यात आरोपी रिक्षा चालक पीडित मुलीचा शेजारी राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन महिन्यापासून आरोपी रिक्षा चालक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचं तक्रार पडीत मुलीकडून करण्यात आली आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बदलापूरला रेल्वे रुळालगत क्रेन कोसळली; तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामात अपघात
बदलापूरमध्ये रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामात अपघात होऊन एक मोठी क्रेन कोसळलीय. सुदैवानं क्रेन आणि रेल्वे रूळ यात अंतर असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. बदलापूर पूर्वेत कर्जत दिशेला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हा अपघात झाला. सध्या कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम सुरू आहे. या कामासाठी ही क्रेन वापरण्यात येत होती. मात्र आज सकाळी अचानक ही क्रेन रेल्वे रुळाच्या बाजूला रस्त्यावर कोसळली. सुदैवाने ही क्रेन रेल्वे रुळावर कोसळली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. त्यामुळं रेल्वे ट्रॅकजवळ काम करत असताना सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
