Raigad Boat Drown: उरणमध्ये खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात बोट बुडाली, पाच जणांनी 9 तास पोहत किनारा गाठला, तीन जण बेपत्ता
Raigad: रायगडच्या उरणमध्ये खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात बोट बुडून बोट दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील आठ खलाशांपैकी 5 जणांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. तर उर्वरित तिघे बेपत्ता आहे.

Raigad Boat Drown: रायगडच्या उरणमध्ये खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात बोट बुडून बोट दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार मासेमारीला बंदी असताना देखील मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या बोटाचा (Boat Drown Accident) हा अपघात घडला आहे. परिणामी उरणमधील मच्छीमार बांधवांचा जीवघेणा मासेमारीचे प्रकार आठ खलाशांच्या चांगलचं अंगलट आलं आहे. यातील आठ खलाशांपैकी 5 जणांनी पोहत अलिबागचा (Alibag) सासवणे समुद्र किनारा गाठला आहे. तर उर्वरित तिघे अद्याप बेपत्ता असून या तिघांचा अजूनही शोध सुरू.
5 जणांनी तब्बल 9 तास पोहत अलिबागमधील सासवणे समुद्र किनारा गाठला
पुढे आलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील आपटा, करंजा आणि हावरे कोळीवाड्यातील 8 मच्छीमार हे शासनाची बंदी असताना देखील खोल समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी गेले आणि त्यांच्या बोटीचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांनी तब्बल 9 तास पोहत अलिबागमधील सासवणे समुद्र किनारा गाठला. मात्र उर्वरित तिघे अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे 6 वाजता हे मच्छीमार मासेमारी करण्यासाठी उरणमधून अलीबागच्या खांदेरी परिसराकडे येत असताना अचानक उसळलेल्या समुद्रातील लाटांमुळे ही बोट उलटली आणि मोठा अपघात घडला. यावेळी समुद्रात पोहता येणाऱ्या काही खलाशांनी फ्लोटरच्या मदतीने आपला जीव वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावत कसाबसा समुद्र किनारा गाठला.
मासेमारी बंदीचे आदेश असताना मासेमारीचा प्रकार आला अंगलट
त्यानंतर मांडवा पोलिसांनी या 5 जणांना अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं. उर्वरित 3 जणांचा शोध कोस्टगार्ड यंत्रणा, स्थानिक बचाव यंत्रणा आणि ड्रोनच्या सहाय्याने करत आहेत. मात्र समुद्रात सध्या मासेमारी बंदीचे आदेश असताना खोल समुद्रात गेलेल्या आठ खलाशांच्या जीवघेणा मासेमारीचा (Boat Drown Accident) प्रकार चांगलाचं अंगलट आला आहे.
बुडालेल्या बोटीतून पोहत येऊन आपला जीव वाचविणारे मच्छीमार यांची नावे
1) रोशन कोळी - आपटा उरण.
3) कृष्णा भोईर - आपटा उरण
4) संदीप कोळी - उरण करंजा.
5) हेमंत गावंड - उरण करंजा.....
दरम्यान, अडकून पडलेले तिघे मुकेश पाटील, धीरज कोळी आणि नरेश शेलार हे अजूनही बेपत्ता झाले आहेत. त्यांचा विविध यंत्रणेच्या आधारावर समुद्रात शोध सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















