पुणे :  मराठा आरक्षणाबाबत नेत्यांनी आता संवेदनशीलता दाखवली  (Yuva Sangharsha Yatra) नाही तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटलांनी दिला आहे. रोहित पाटील (Rohit Patil) हे सध्या आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत नागपूरपर्यंत पायी निघाले आहे. यावेळी ते युवकांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून ते समस्या जाणून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रति वर्षी दोन लाख रोजगार देऊ असं म्हटलं होतं, प्रत्यक्षात बेरोजगारी दूर झाल्याचं दिसतंय का? बेरोजगारांमध्ये मराठा समाजाच्या तरुण अधिक आहेत? मराठा नेते आता तरी संवेदनशीलता दाखवणार का? असे विविध प्रश्न यावेळी रोहित पाटलांनी उपस्थित केले आहेत. 


रोहित पाटील म्हणाले की, युवा संघर्ष यात्रा ही तरुणांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी आहे. त्याचबरोबर ही यात्रा राज्यातील अनेक गावांमध्ये जात आहे. सोबतच गावातील प्रश्नांचीदेखील माहिती मिळते आहे. गावातील प्रश्नदेखील कळत आहे. राज्यात फक्त युवाकांचेच प्रश्न नाहीत तर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न समजत आहे. गावातील प्रश्न जेव्हा लोक रोहित पवारांकडे घेऊन येतात तेव्हा ते लोकांना निवेदन द्या,असं सांगतात हे सगळे लोकांचे निवेदन येत्या अधिवेशनात मांडमार आहोत आणि प्रश्नांवर तोडगा काढणार आहोत. 


 निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण देऊ नका...


बेरोजगारी एखाद्या रोगापेक्षा वाढली आहे.तरुणांना नोकऱ्या नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंब अस्थिरतेकडे जात आहे. त्यात शेतीतून मिळणारा पैसाही पुरेसा मिळत नाही आहे. उत्पादनाचा खर्च वाढला आहे आणि उत्पन्न घटलं आहे. सगळे शेतकरी ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही परिस्थिती आता शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचं अर्थचक्र मंदावल्याचं दिसत आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. शेती आणि नोकरी यावर सगळं कुटुंब अवलंबून असतं. मात्र शेती आणि नोकऱ्या दोन्ही नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही ते म्हणाले.युवा संघर्ष यात्रेत सर्व समाजातील युवाकांच्या फायद्याचे मुद्दे आहेत. हे प्रश्न घेऊन नागपूरपर्यंत जाणार आहोत. याच प्रश्नांवर राज्य शासनाने काम केलं तर युवकांच्या अनेक अडचणी दूर होतील. निवडणुकीच्या तोंडावर कोणताही निर्णय घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे. 


ही बातमी वाचा: