पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात तापमानात (Pune Weather Update) चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 43 अंशावर गेला होता. पुणेकर उकाड्यामुळे चांगलेच हैराण झाले. मात्र पुढील काही दिवसांत पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD Pune) पुणे यांनी येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा अलर्ट जारी केला असून, हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. 


आयएमडीच्या अंदाजानुसार, 8 ते 11 मे दरम्यान हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत मुख्यत: स्वच्छ आकाश हळूहळू अंशतः ढगाळ होईल. 12 आणि 13 मे रोजी हवामानाला वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे अंशत: ढगाळ वातावरणामुळे वादळी वारे, वीज आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे सध्याच्या उकाड्यापासून  दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तवला आहे. 


मात्र या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा होण्याची शक्यातादेखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांचंदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसापूर्वीच हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


13 मेला पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी पावसाची आणि वादळीवाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. मतदाराने काळजी घेवून मतदानासाठी हजेरी लावाली, असंदेखील आवाहन करण्यात आलं आहे. 


उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा


मागील काही दिवसांपासून पुण्यात चांगलाच उन्हाचा तडाखा वाढला होता. किमान आणि कमाल तापमानातदेखील वाढ झाली आहे. रात्रीच्या तापमानातदेखील वाढ झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे रात्रीदेखील पुणेकर गरमीने हैराण झाले होते. यंदा उन्हाळा जास्त जाणवू लागला आहे. त्यात एप्रिल महिन्यात तापमानाने चाळीशी पार केली होती. या पावसामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे. मात्र त्याच बरोबर पुणेकरांना अलर्ट रहावं लागणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar: शरद पवार इज बॅक, 84 वर्षांचा योद्धा पुन्हा लढाईत उतरणार, पुढच्या तीन दिवसांत दौरे आणि सभांचा धडका


Sunil Shelke Vs Rohit Pawar : सुनिल शेळकेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले मटण अन् मतांना दोन हजार...


AstraZeneca COVID 19 Vaccine: कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा