Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या राज्यभरात सुरू आहे, विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. तर काल झालेल्या मारहाणीबाबत आणि यापुढे त्यांची भूमिका काय असणार आहे, याबाबत त्यांनी आज एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' या कार्यक्रमात सविस्तरपणे माहिती दिली आहे.(Vidyanand Bapat on Coffee With Kaushik)

Continues below advertisement

Vidyanand Bapat  : बलप्रयोगाचा प्रतिवाद बलप्रयोगाने करायचा असतो

कालच्या मारहाणीच्या घटनेनंतर आता भीती वाटते आहे का? आता या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घ्यावं असं वाटतं हे का? या प्रश्नावरती उत्तर देताना विद्यानंद बापट म्हणाले, छे...छे...अजिबात नाही... कारण की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायचा असतो. तुम्ही विचार मांडलेलेच नाहीत आणि बलप्रयोगाचा प्रतिवाद बलप्रयोगाने करायचा असतो. हे दोन वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये जात आहे. विचारांच्या डायमेन्शनमध्ये तुम्ही विचाराने प्रतिवाद करणार असाल तर त्याचा विचार करता येऊ शकतो. पण, बलप्रयोगाच्या डायमेन्शनमध्ये जात असाल तर ते त्या प्रकारे सोडवले जाईल. त्यामुळे सवालच उपस्थित होत नाही. आता माझी भूमिका आहे ती तशीच राहणार आहे, या घटनेनंतर परिवाराच्या प्रतिक्रिया काय आहेत, हा मुद्दा तुम्ही उचलल्यानंतर? यावरती बापट म्हणाले की, मला तेच सांगत आहेत की, काळजी घेत जा, फोन उचलत जा. तेवढेच बाकी काही नाही. तुम्ही आता थांबा असे काही परिवारवाले म्हणत आहेत का?यावर विद्यानंद बापट म्हणाले, असं काही सांगितले जात नाही आणि मी ऐकणार देखील नाही. कारण मी आता इतक्या लहान वयात नाहीये असंही पुढे बापटांनी म्हटलं आहे.

Pune News: पुण्यात डीजेवरून वाद; विरोध करणाऱ्या बापटांना मारहाण

पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, काल (गुरूवारी, ता 3) विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

Continues below advertisement