पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane death) प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने काल(बुधवारी) सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीच्यावतीने त्यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद करीत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या प्रयत्न केला. वैष्णवीचे (Vaishnavi Hagawane death) एका परपुरुषासोबत चॅट सुरू होते. हगवणेंना ते चॅड सापडलं होतं. त्याचमुळे आम्ही तिला तिच्या घरी पाठवायचो, असे हगवणे कुटुंबाने वकिलामार्फत सांगितले. वैष्णवीचे चॅट तपासा, अशी मागणी हगवणे कुटुंबाने न्यायालयात केली. मिडियाच्या माध्यमातून कस्पटे कुटुंबाने आम्हाला 50 लाखांची फॉर्च्युनर गाडी दिली, असे सांगितले गेले. पण त्याच्याआधी आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या होत्या. त्यामुळे 50 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी आम्ही कशाला तिचा छळ करू, असे हगवणे वकीलामार्फत म्हटलं आहे.  हगवणेंकडे पाच कोटींची वाहन असल्यानं आम्ही फॉर्च्युनरची का मागू? असं म्हणणाऱ्या हावरट हगवणेंची पोलखोल करणारा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती आला आहे. अधिकमासाला जावई शशांक आणि हगवणे कुटुंबीयांचा हावरटपणा या व्हिडीओत दिसतो आहे. यात शशांकने केवळ स्वतःचा नव्हे तर भाऊ सुशीलचा ही हट्ट पुरवून घेतला.(Vaishnavi Hagawane death) 

आदीकमासात जावई अन् सुशीलला कस्पटे कुटुंबीयांनी काय-काय दिलं?

चांदीचे ताट

शशांकला अंगठी

शशांक आणि सुशीलला - चांदीचे निरंजन 

सुशील - चांदीचे देवाचे तामनाचे ताट

तसेच ब्रॅण्डेड कपड्यांचा फुल पोशाख 3

 

लग्नात काय काय दिलं?

वैष्णवीला लग्नात वडिलांनी 51 तोळे सोनं दिलं. हुंड्यात एक फॉर्च्युनर गाडी देखील दिली होती. सात किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती दिली होती. जावयाला अधिक मासात एक सोन्याची अंगठी दिली. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रुपये दिले. जावयाला नुकताच दीड लाखाचा एक फोन दिला होता. पुण्यात सनीज वर्ल्डमध्ये लाखो रूपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह आयोजित केला होता. लग्नाची चर्चा पंचक्रोशीत होती.

लग्नात पाण्यासारखा खर्च, अलिशान रिसॉर्ट अन् करोडोंची सजावट

*वैष्णवीच्या लग्नासाठी तब्ब्ल दहा लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले. * लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च करायला लावले. * पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. एक व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च करायला लावले. *पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला. * लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले, त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले. अशाप्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला होते.