Vaishnavi Hagawane Death: 3500 रूपयांनी वारजेत घेतला 1BHK फ्लॅट; दुसऱ्याच दिवशी शस्त्रपरवान्यासाठी अर्ज, महिनाभरात परवाना, ‘रेड कार्पेट ट्रीटमेंट’ मिळाल्याची चर्चा
Vaishnavi Hagawane Death: जालिंदर सुरेकर यांच्या मदतीने सुशील आणि शशांक यांचा मार्ग मोकळा झाला का हा चर्चेचा विषय बनला आहे. शशांक आणि सुशील हगवणे हे दोघंही सध्या अटकेत आहेत.

Vaishnavi Hagawane Death: पुण्यातील हगवणे बंधूंना (शशांक आणि सुशील) अवघ्या सव्वा महिन्यात शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामान्य नागरिकांना जिथे शस्त्र परवान्यासाठी 7 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, तिथे या दोघांना झटपट मंजुरी मिळाल्यामुळे पोलिस प्रशासनावर त्याचबरोबर हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टींचा अडथळा आला नाही का? असे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे शस्त्र परवाना देताना त्यांना शशांक आणि सुशील हगवणे यांना ‘रेड कार्पेट ट्रीटमेंट’ दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
₹3500 वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला
शशांक हगवणे याने 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातील वारजे भागामध्ये फक्त ₹3500 वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबरला शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. केवळ 40 दिवसांत म्हणजे 22 नोव्हेंबरला त्याला शस्त्र परवाना मिळाला. सुशील हगवणे यानेही 28 सप्टेंबर 2022 रोजी कोथरूडमध्ये सदनिका भाड्याने घेतली. 30 सप्टेंबरला अर्ज केला आणि 1 नोव्हेंबरला परवान्याची मंजुरी मिळाली, म्हणजे अवघ्या मधल्या 33 दिवसांत मंजुरी मिळाली आहे. या दोघांनी शस्त्र परवान्यासाठी खोटे पत्ते दाखवले होते, हे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे पुणे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, जालिंदर सुरेकर यांच्या मदतीने सुशील आणि शशांक यांचा मार्ग मोकळा झाला का हा चर्चेचा विषय बनला आहे. शशांक आणि सुशील हगवणे हे दोघंही सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर मानसिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांची मालमत्ता, परवाने आणि अन्य बाबींचा तपास सध्या सुरु आहे. त्याचबरोबर शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली. त्या दोघांनी अर्ज करताना खोटा पत्ता दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दोघांवर वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुपेकर तेव्हा हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त
जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी ठोस असं काही कारण नव्हतं. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला त्यावरती जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
हगवणे बंधुंना मिळालेल्या शस्त्र परवान्यांवर सही मामा सुपेकर यांचीच
हगवणे बंधुंनी शस्त्रपरवाना मिळवण्यासाठी 2022 मध्ये पुण्यातील बनावट पत्ते पोलीसांना सादर केले. त्या पत्त्यांची खातरजमा पोलीसांनी केली नाही. जालींदर सुपेकर हे त्यावेळी पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यांनी स्वतःच्या सहीने शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली. शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती असते. ज्यात पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडुन भाच्यांच्या शस्त्रपरवान्याची फाईल मंजुर करुन घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावर सही केली.


















