Nilesh Chavan Arrest: निलेश चव्हाणला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात युक्तीवादावेळी काय-काय घडलं? सरकारी वकिलांनी सांगितल्या तपासाच्या बाबी
Nilesh Chavan Arrest: निलेश चव्हाणला बावधन पोलीसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला आरोपी नीलेश चव्हाण याला ३० मे (शुक्रवार) रोजी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे, आणि शस्त्र दाखवून धमकी देणे यांसह अनेक गंभीर आरोप होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ लूक आऊट नोटीस जारी केली होती. 29 मे रोजी त्याच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 30 मे रोजी, नीलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलं आहे. निलेश चव्हाणला बावधन पोलीसांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद काय?
न्यायालयात सरकारी वकीलांनी युक्तीवाद करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायाधीशांसमोर मांडले. त्यामध्ये निलेश चव्हाणकडे असलेले लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचे मोबाईल जप्त करायचे आहेत. वैष्णवीच्या छळवणुकीचा, छळ करण्याचा, कट कसा रचण्यात आला, याची चौकशी करायची आहे. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाणने स्वतःकडे कोणत्या अधिकारात ठेवले याची चौकशी करायची आहे. निलेश चव्हाणवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आली आहे. निलेश याने नातेवाईक नसताना देखील निलेशने वैष्णवीचे बाळ स्वतःकडे ठेवले. निलेश चव्हाणने करिष्माला फुस लाऊन वैष्णवीचा छळ करायला लावला. निलेशकडे असलेले पिस्तुल जप्त करायचे आहे. निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे, हे मुद्दे सरकारी वकिलांनी कोर्टापुढे मांडले. त्यानंतर कोर्टाने निलेश चव्हाणला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैश्नवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील इतर आरोपी यांच्यात मोबाइलवरुन संभाषण झाले आहे . त्या संभाषणाची माहिती पोलीसांना घ्यायची आहे. निलेशची वैश्नवीच्या आत्महत्येत काही भुमिका आहे का याचा तपास करायचा आहे, असंही सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं आहे.
निलेश चव्हाणच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद
निलेश चव्हाणच्या वकीलांनी कोर्टापुढे युक्तीवाद करताना निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता. त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं आहे. निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता. म्हणून त्याला आरोपी करण्यात आलं आहे. निलेश चव्हाणने त्याचावर दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलीसांना सहकार्य केल्याचा युक्तीवाद वकिलांनी केला आहे.
निलेश चव्हाणचा माग कसा काढला?
- 25 मे ला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.
- गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.
- पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.
- 30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले. त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या.
























