पुणे: पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. वारजे पोलीसांची तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना खोटी माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. "फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय" असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता, पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मात्र, फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला.(Vaishnavi Hagawane Death)
फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूने त्याने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता. संतोष दत्तात्रय गायकवाड, (वय 33) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे. त्याची जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे सापडला. त्याच्याकडे चौकशी केली. त्या व्यक्तीने खोटे कॉल केले असल्याचे आढळून आले.
निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार
वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर निलेश चव्हाणविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 मे रोजी घडली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी कस्पटे कुटुंबीय कर्वेनगरमधील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. मात्र, बाळाचा ताबा देण्यास नकार देत निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत घराबाहेर काढले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनोज कस्पटे यांनी वारजे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, निलेश चव्हाण याने बाळ बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवले असून, त्या वेळेस धमकावण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली निलेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिची नणंद करिश्मा हगवणे यांचा जवळचा मित्र असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या तिघांवर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेशच्या चव्हाणच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला. त्याचा अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला. निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणुन ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत.
सनकी निलेश चव्हाणचे कारनामे उघड
3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले.