Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
Murlidhar Mohol: पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्व्हॉयमध्ये मद्यधुंद चालकाने भरधाव कार घुसवून वाहनाला कट मारल्याची धक्कादायक घटना घडली. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्व्हॉयमध्ये (Convoy) एका बेदरकार कारचालकाने भरधाव कार घुसवून वाहनाला कट मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 32 वर्षीय कारचालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक हा घटनेच्या वेळी प्रचंड दारूच्या नशेत (Drunk Driving) असल्याचा प्राथमिक आरोप पोलिसांनी केला आहे.
Muralidhar Mohol Convoy Incident : नक्की काय घडला प्रकार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून शिवाजीनगर मार्गे कोथरूड येथील आपल्या निवासस्थानाकडे कॉन्व्हॉयसह जात होते. त्याचवेळी शुभम विजय वनीत (वय 32, रा. नाना पेठ) या चालकाने मद्यप्राशन करून आपली कार बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवत थेट व्हीआयपी कॉन्व्हॉयमध्ये घुसवली.
Security Breach Pune : पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही पुढे जाण्याचा प्रयत्न
मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले (वय 50) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभम वनीत याने पुढे जाण्याच्या घाईत मंत्री मोहोळ यांच्या वाहनाला धोकादायकरीत्या कट मारण्याचा प्रयत्न केला. कॉन्व्हॉयमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला गाडी थांबवण्याचा वारंवार इशारा दिला, तरीही तो बेधडकपणे गाड्यांच्या मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.
Drunk Driver Arrested : भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी शुभम वनीत याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) कलम 184, 185 आणि 119/177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विकास काटे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha





















