Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News पुणे: पुण्यातील एका अध्यात्मिक गुरुंची व्हिडीओची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे. उमेश तागुंदे (Umesh Appa Tagunde)  नावाच्या या गुरुंच्या शिष्या त्यांचे पाणी आणि दुधाने पाय धुऊन ते दुध प्राशन करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. उमेश तागुंदेंचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Umesh Appa Pune News)

Continues below advertisement

एक दोन नाही, तर असे अनेक शिष्य आणि शिष्या उमेश तागुंदेंचे पाय धुऊन पाणी पिताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का? असा प्रश्न एबीपी माझाने अध्यात्मिक गुरू असलेल्या उमेश तागुंदे (Umesh Tagunde ) यांना विचारला. यावर आपण भक्तांना पाय धुऊन पाणी पिण्याचे कोणतेही आदेश देत नाही, भक्त स्वतः हून पाय धुऊन पाणी पितात आणि मी स्वतःही माझ्या गुरुंचे पाय धुऊन पाणी पितो, असं उत्तर उमेश तागुंदे यांनी दिलं. तसेच मी माझे पाय धुण्यास भक्तांना विरोध करतो, असंही उमेश तांगुदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. (Umesh Appa Tagunde Baba Video)

एबीपी माझाशी बोलताना उमेश तागुंदे काय म्हणाले? (Pune Umesh Appa Tagunde)

तुमचे भक्त पण तुम्हाला पप्पा म्हणतायत?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर हा, ते पण पप्पाच म्हणतात, असं उमेश तागुंदे म्हणाले. पण मी असं स्वतः कुणाला म्हणलो नाही की मला भाऊ म्हण, पप्पा म्हण किंवा काय म्हण. त्या मुलाला माझ्याविषयी प्रेम होतं म्हणून तो पप्पा म्हणायला लागला, मग ते बाकीचे पप्पा म्हणायला लागले, असं उमेश तागुंदे यांनी सांगितले. तसेच तुमचे पाय महिला भक्त धुतायत आणि पाय धुतल्यानंतरचे पाणी ताटामध्ये जमा होतंय, ते पाणी या महिला प्राशन करतायत. तर हे दिसायला तर खूपच किळसवाणं दिसतंय आणि तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे, असंही म्हटलं जातंय, असं उमेश तागुंदेंना विचारण्यात आलंय यावर आता गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो, माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी प्यालो. इथे मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो, त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की, तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या. उलट मी नाही म्हणत होतो सगळ्यांना. पण त्यांची भावना होती, त्यांची श्रद्धा होती, असं उमेश तागुंदेंनी उत्तर दिलं. 

Continues below advertisement

तुमचं शिक्षण कुठं झालंय?, तुम्ही व्यवसाय काय करत होतात? (Pune Umesh Appa)

माझं शिक्षण 12 वी झालंय. शिक्षण माझं काही शिक्षण थोडं वाघोलीला झालंय. मामांच्या इथे आणि काही इथं झालेलं आहे, नवभारत हायस्कूल शिवनेमध्ये झालेलं आहे. आणि पहिल्यापासून दुग्धव्यवसाय आहे. चौकामध्ये इथं हॉटेल आहे. भाजीपाल्याचा पण व्यवसाय होता. आणि चिरून भाजी पॅकिंग करून देणे. परत मग गाई होत्या भरपूर माझ्याकडे...पहिल्या 30-50 गाई होत्या. आता एक थोड्या दिवसांपूर्वी मी गाई कमी केल्या. कारण आता कसं, शेण टाकायला जागा नाही, काय नाही. आता पण दोन-तीन गाई आहेत. हा, तर दुधाचा व्यवसाय आहे. आणि जागा घेणे, परत ती थोड्या दिवस ठेवून विकणे, हे खरेदी-विक्रीचा पण व्यवहार आहे. इथं मग हळूहळू मी खोल्या पण बांधल्यात. आणि आमचं जुन्या म्हणजे पहिल्यापासूनचे म्हणजे आमच्या वडिलांनी घेतलेली जागा होती, तिथं आमचं बांधकाम केलेलं आहे, त्याचं भाडं वगैरे पण येतं, असं उमेश तागुंदेंनी सांगितले. 

कोण आहे उमेश पाप्पा तागुंदे? (Who Is Umesh Appa Tagunde?)

उमेशपाप्पा तागुंदे (उमेश आप्पा म्हणून ओळखले जाणारे) हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वारजे माळवाडी येथे राहणारे एक आध्यात्मिक गुरू आणि प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा मोठा अनुयायी वर्ग असून, ते देवी कालूबाई (आई कालेश्वरी) यांच्या भक्तीशी संबंधित आध्यात्मिक प्रवचने आणि पारंपरिक 'दरबार' आयोजित करतात. पुण्यातील उमेश पप्पा तागुंदे हे सोशल मीडिया आणि व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर धार्मिक कार्यक्रम, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि विविध धार्मिक विधींशी संबंधित व्यक्ती म्हणून चर्चेत असतात. त्यांच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट्स आणि यूट्यूबवरील अनेक व्हिडीओ उपलब्ध असून, त्यामध्ये भक्तांचे कार्यक्रम, आरती तसेच विविध धार्मिक विधी दाखवल्याचं दिसून येत आहे.

ही बातमीही वाचा:

Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?