Uddhav Thackeray on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये हडप करण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर सडकून टीका होत आहे. आज (8 नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील चारदिवसीय दौऱ्यातील अखेरच्या दिवशी अजित पवारांवर सडकून प्रहार करत अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की अजित पवारांच्या मुलाला सोडून कोणालाच फुकट नको असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे म्हणाले की शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवत आहेस, असा शब्दामध्ये अजित पवार यांनी केलेला वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. पक्ष चोरल्यानंतर हे सरकार अगोदर मत चोरी करून सत्तेत आलं आणि आता जमिनी सुद्धा चोरत असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री क्लीन चीटर झाले आहेत 

दरम्यान, पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईला वेगळा असला तरी पार्थ पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्यवहारावरून विरोधकांकडे सडकून प्रहार होत असताना ठाकरे यांनी सुद्धा टोला लागावला. ते म्हणाले की सगळेच गुन्हेगार भाजपमध्ये आहेत. मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चीट देतात म्हणून ते क्लीन चीटर झाले आहेत. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना गृहकलहमंत्री म्हणत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा मुरलीधर मोहोळ जमीन प्रकरण समोर आल्यानंतर पार्थ पवार प्रकरण समोर आलं. आता प्रताप सरनाईक प्रकरण समोर येत आहेत, अशा शब्दात त्यांनी जमिनीच्या व्यवहारावरून हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना दिलासा देत ते म्हणाले की तुमच्या मनामध्ये ठिणगी आहे ती या सरकारला दाखवून द्या. शेतकऱ्यांची ठिणगी पडली तरी सरकार जळून खाक होईल, असा इशारा त्यांनी दिला. 

गावामध्ये बोर्ड लागले पाहिजेत

कर्जमाफीवरून ते म्हणाले की, गावामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, कर्जमुक्ती नाही तोपर्यंत मत देणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर बोलत आहेत ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याचं त्यांनी सांगितले. 31,800 हजार कोटींच्या पॅकेजवरूनही त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले माझ्यापेक्षा 10 पाऊल पुढे जाणार मुख्यमंत्री असेल तर मी त्याचा जाहीर सत्कार करेन. मात्र, मदत काही मिळालेली नाही. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या