पिंपरी चिंचवड : भोसरीत पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईनं आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे.

काल भोसरीत तीन मुलांसह आईचा मृतदेह घरात फासाला आढळल्याने खळबळ उडाली होती. आईने तिन्ही मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र हत्या करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या नातेवाईकाला संशयावरून ताब्यात घेतलं आहे.

मूळ कर्नाटक येथील हे कुटुंब पुण्यात फळ विकून पोट भरत असे. आधी वारजे, मग तळेगाव आणि चार दिवसांपासून भोसरीत ते स्थायिक झालं होतं. वारजे आणि तळेगाव इथं मोठं नुकसान झेलून ते भोसरीत नव्यानं व्यवसाय टाकणार होते. पण तत्पूर्वी काल सकाळी पती-पत्नीचा वाद झाला. व्यवसाय करता येत नसल्याने आपलं कुटुंब स्थिर राहत नसल्याचा ठपका पत्नीने पतीवर ठेवला. यामुळं नाराज पती सकाळी साडे दहा वाजता घर सोडून गेला. त्यानंतर पती सायंकाळी चार वाजता परतला त्यावेळी घराचे दार वाजवले. पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता. मग घर मालक अस्लम पठाण यांनी भोसरी पोलिसांशी संपर्क साधला. घराचे दार तोडले असता तिन्ही मुलं आणि आई फासाला लटकलेली आढळली, अशी याप्रकरणी प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर फातिमा यांनी तिन्ही मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता.

पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांची फाशी रद्द