पुणे: विवाहाला विश्वास आणि निष्ठेचा पवित्र बंध मानले जात असले तरी आता या नात्यातील विश्वास मोठ्या प्रमाणात तुटताना दिसतो आहे. एका नव्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून भारतातील विवाहित लोक मोठ्या संख्येने विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचे उघड झाले आहे. ॲशली मॅडिसन डेटिंग ॲप्स अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

कांचीपुरम अव्वल

तमिळनाडूतील कांचीपुरम, जे आतापर्यंत रेशमी साड्या आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध होते, आता विवाहबाह्य संबंधांचे नवे केंद्र बनले आहे. ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या जून 2025 च्या अहवालानुसार, कांचीपुरमने  विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणांत देशातील सर्व शहरांना मागे टाकले आहे. एक वर्षापूर्वी या शहराचा क्रमांक 17वा होता, तर आता ते थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

दिल्ली एनसीआरही मागे नाही

या अहवालातील भारतातील टॉप 20 जिल्ह्यांमध्ये दिल्ली-एनसीआरचे तब्बल 9 जिल्हे आहेत. सेंट्रल दिल्ली दुसऱ्या स्थानी असून गुरुग्राम, नोएडा, गाझियाबादसह साउथ वेस्ट, ईस्ट, साउथ, वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट दिल्लीही या यादीत आघाडीवर आहेत.

Continues below advertisement

पुणे, बेंगळुरूही टॉपमध्ये

रिपोर्टनुसार, आठव्या क्रमांकावर पुणे, नवव्या क्रमांकावर बेंगळुरू आणि दहाव्या क्रमांकावर साउथ दिल्ली आहे. सहाव्या स्थानी देहरादून, तर सातव्या स्थानी ईस्ट दिल्ली आहे.

विवाहबाह्य संबंधांमागची कारणे

तज्ज्ञांच्या मते, महानगरांतील व्यस्त जीवनशैली, सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव, कामाचे दीर्घ तास आणि वैवाहिक नात्यांतील भावनिक दुरावा हे घटक विवाहबाह्य संबंधांना चालना देत आहेत. अनेक विवाहित व्यक्ती नवीन पार्टनरच्या शोधात असतात. काहींच्या मते, भावनिक असमाधान, मुलांनंतर बदललेले नाते किंवा केवळ रोमँसची इच्छा यामुळे "एकाहून अधिक पार्टनर" ठेवण्याचा ट्रेंड वाढतो आहे.

डेटिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडिया मुख्य मार्ग

या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की विवाहित लोकांसाठी खास डिझाईन केलेले डेटिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियावरील नवे कनेक्शन यामुळे विवाहबाह्य संबंधाला प्रोत्साहन मिळत आहे. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटही विवाहबाह्य संबंधांना सामान्य आणि ग्लॅमरस दाखवत असल्याने लोक अपराधी न वाटता या नात्यांकडे आकर्षित होत आहेत.

भारतामध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये टॉप 10 शहरे

1. कांचीपुरम2. सेंट्रल दिल्ली3. गुरुग्राम4. नोएडा5. साउथ वेस्ट दिल्ली6. देहरादून7. ईस्ट दिल्ली8. पुणे9. बेंगळुरू10. साउथ दिल्ली11.चंडीगड12.लखनौ13.कोलकाता14.पश्चिम दिल्ली15. कामरूप16. उत्तर पश्चिम दिल्ली17. रायगड (छत्तीसगड)18. हैदराबाद19.गाझियाबाद20.जयपूर

पुणे आठव्या स्थानी का ?

पुण्याची लोकसंख्या ही मुख्यत्वे विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील काम करणारे आणि विविध भागांतून आलेल्या स्थलांतरित नागरिकांचा लोंढा आहे. पुण्याचे बहुसांस्कृतिक वातावरण आणि वाढती नाइटलाइफ, आणि इतर गोष्टींचे आकर्षण यामुळे हे शहर विवाहबाह्य किंवा मुक्त संबंधांसाठी एक प्रमुख केंद्र बनत चालले आहे.

डिजिटल वापर, इंटरनेचा वाढता प्रभाव, भावनिक अंतर, कामाचे दीर्घ तास आणि सामाजिक घटक यामुळे भारतासारख्या परंपरांचा आणि संस्कृतींचा वारसा असलेल्या देशात नातेसंबंधांची समीकरणे बदलू लागले आहेत. लोकांच्या खासगी निवडी बदलू लागल्या आहेत, तसतसे भारतीय नातेसंबंधांचे निकषही बदलच असल्याचं चित्र आहे.