पुणे : कुंडमळ्यात तीन बहिणी वाहून गेल्या, दोघींना वाचवण्यात यश
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2018 07:17 PM (IST)
जीवाची पर्वा न करता पर्यटकांनी दोघींना वाचवलं, तर तिसरीचा एनडीआरएफच्या जवानांकडून शोध सुरू आहे. वाहून गेलेल्या तरुणीचं शालिनी चंद्रबालन असं नाव आहे.
पुणे : पुण्यातील कुंडमळ्यात तीन बहिणी वाहून गेल्याची घटना घडली. जीवाची पर्वा न करता पर्यटकांनी दोघींना वाचवलं, तर तिसरीचा एनडीआरएफच्या जवानांकडून शोध सुरू आहे. वाहून गेलेल्या तरुणीचं शालिनी चंद्रबालन असं नाव आहे. दुपारी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. आकुर्डी येथून एक भाऊ, दोन सख्ख्या बहिणी आणि दोन नात्यातील बहिणी असे पाच जण मावळमध्ये फिरायला आले होते. यापैकी एकीचा पाय घसरला, ती वाहून जात असल्याचं पाहून दोन बहिणी पाण्यात उतरल्या. मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता, की त्या तिन्ही बहिणी वाहून जाऊ लागल्या. उपस्थित पर्यटकांनी हे पाहताच, जीवाची पर्वा न करता दोघींना वाचवलं. शालिनीच्या शोधासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आता एनडीआरएफला पाचारण केलं आहे. पाण्याच्या प्रवाहात ती बरंच पुढं वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.