पुणे: हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईपलाईन फोडून ५ हजार लिटर पेट्रोल चोरीप्रकरणी पुण्यात तीन पोलिसांसह सहा जणांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भिडे, पोलिस उपनिरीक्षक ठोंबरे यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवशरण यांंना अटक करण्यात आली आहे. तर इस्माईल शेख, दिनेश पवार, मोतीराम पवार या तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.


१५ दिवसांपूर्वी विमाननगर इथं हा प्रकार उघडकीस आला होता. मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाईपलाईनमध्ये प्रेशर कमी येत असल्यानं पाईपलाईन कुठेतरी फुटल्याचा संशय कंपनीला आला. त्यानुसार तपासणी केली असता ही पेट्रोल चोरी समोर आली.

वरील आरोपींनी संगनमताने पंधरा दिवसांपूर्वी लोहगाव येथील तालेरा फार्म हाऊसच्या हद्दीत मुंबईहून लोणीकडे जाणारी पाईप लोईन फोडून पाच हजार लिटर पट्रोलची चोरी केली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तपास करुन ही कारवाई केली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी देहूरोड परिसरातही अशाच प्रकारे पेट्रोल चोरी करण्यात आली होती.