Pune PMPML Bus Crime: पिंपरी-चिंचवडमधील (PCMC) कासारवाडी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस कंडक्टरकडून 3 हजार 355 रुपये लुटल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फुगेवाडी येथील 26 वर्षीय कुणाल कालेकर आणि 20 वर्षीय ओंकार चव्हाण अशी या दोघांची नावे आहेत. पीएमपीएमएल बसमधील दरोड्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.


भोसरी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीएमपीएमएल बसचे कंडक्टर हेमंत पेठे आणि चालक गौतम भालेराव हे निगडी-शेवळवाडी मार्गावर ड्युटीवर होते. तीन जण बसमध्ये चढले आणि रात्री 12.30 च्या सुमारास कासारवाडी येथे थांबल्यावर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने त्यांना शांत राहण्याची विनंती केली असता तिघांनी दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यापैकी एकाने कंडक्टर पेठा यांच्याकडून 3,355 रुपये आणि एक मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पेठे यांनी आरोपीकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांच वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून आले. हा सगळा प्रकार रात्री घ़डत असल्याने मदत मागणं शक्य नव्हतं. 


भाड्याचे पैसेही पसार केले
कंडक्टरला मारहाण केली. त्यांच्यासोबत वादावादी केली.  मोबाईल हिसकावून घेतला मात्र दोघांमधील वाद थांबत नव्हता. त्यानंतर दोघांनीही कंडक्टरला पैसे देण्याची धमकी दिली मात्र कंडक्टर मानले नाही त्यानंतर पून्हा वादावादी झाली आणि दिवसभरात प्रवाशांकडून मिळालेले भाड्याचे पैसे पसार केले. बसमधील प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू करून दोघांना अटक केली.


PMPLM बसमध्ये रोज अनेक छेडाछेडीचे प्रकरणं समोर येतात. या सगळ्यांमध्ये कंडक्टर मदत करण्यासाठी तत्पर असतात. रात्रीच्या वेळी कंडक्टर अनेक महिलांची सुरक्षा करत असल्याचं आपण कायम ऐकतो. कात्रज परिसरात एक महिला बस स्थानकावर एकटीच असल्याचं पाहून कंडक्टर त्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती येतपर्यंत थांबले होते. अशा अनेक प्रकारे कंडक्टर सुरक्षित बस कशी ठेवता येईल याची काळजी घेतता मात्र यंदा कंडक्टरलाच लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कंडक्टरच सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.