पुणे : राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चर्चेत असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरील (Raigad) वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तेथून हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकांच्या प्रश्नापेक्षा या विषयांवर भर दिला जात आहे. यातून समाजातून तेढ निर्माण होत आहे. हे चिंताजनक आहे. औरंगजेब कबरीच्या विषयानंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आला आहे. ऐतिहासिक विषय हे जातीविषयक विषय नसतात, तत्कालीन परिस्थितीनुसार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर माणसे निवडली नाहीत, अनेक संघटना आणि लोक यावर बोलत आहेत, सरकार, भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारतील कोणालाही घेऊ नये. त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन शासन त्यामध्ये ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत प्रामाणिकपणे महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला वाटतं, असं भूषणसिंहराजे होळकर म्हणालेत.
काहींना सोबत घेऊन समिती नेमावी
या विषयावर बोलायची इच्छा नव्हती. मात्र, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून बोलत आहे. स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना आहे. सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारतील कोणालाही घेऊ नये. त्यांनी दोन्ही बाजू समजून घ्याव्या आणि तोडगा काढावा असंही ते म्हणालेत. तर छत्रपती घराण्याशी होळकरांशी संबंध आहेत, होळकर घराण्याने शिवसमाधीसाठी निधी दिला होता, त्यामुळे आमच्या समाजाच्या भावना देखील त्या स्मारकाशी जोडल्या गेल्या आहेत असंही ते पुढे म्हणालेत.
होळकरांचा सहभाग आला तो म्हणजे..
हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सर्व बाजू समजून घेऊन, दोन्ही बाजू ऐकून, दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेऊन शासन त्यामध्ये ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत प्रामाणिकपणे महाराष्ट्राने राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. यामध्ये होळकरांचा रोल कुठे येतो तर होळकरांनी रायगडावरच्या समाधीसाठी देणगी दिली. इथून होळकरांचे त्यामध्ये सहभाग सुरू होतो. वाघ्या कुत्र्याचा प्रकरण हे शिवकालीन आहे, आपल्याला दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. होळकरांचा सहभाग आला तो म्हणजे समाधीचा जिर्णोद्धार करायचा होता त्यावेळी, ज्यावेळी शिवसमाधी उभी राहायची होती त्यावेळी निधीची कमतरता पडत असताना काही जण शिव समाधी बांधण्यामध्ये समाविष्ट होते ती इंदौरला गेली आणि त्यांनी तिथून होळकरांचा या प्रकरणाशी संबंध येतो. होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना जोडलेले आहेत आणि कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करून काही लोक त्याच्या विरोधात स्टेटमेंट देत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे, दोन्ही गटाच्या बाजूच्या संघटनेने सर्व वेगवेगळ्या लोकांनी आज यावर बोलत आहेत, कोणाचे राजकीय हेतू असतील, कोणाचे स्वतःचे मतं असतील, त्यात मला पडायचं नाही, पण कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने या महाराष्ट्राचे सामाजिकता धक्का पोहोचणार नाही या दृष्टिकोनातून याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे.
होळकरांनी कधीही इंग्रजांच्या बरोबर तह केलेला नाही....
दुसरी यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे, काल या पत्रकार परिषदेमध्ये एका व्यक्तीने सांगितलं, होळकर हे इंग्रजांना घाबरत होते. मी हे एका पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं. त्यांना मला हे सांगायचं आहे, भारतामध्ये सर्वात शेवट इंग्रजांच्या विरोधात जर कोणी लढा दिला असेल ते महाराजा यशवंतराव होळकर होते. 1818 पर्यंत होळकर यशवंतराव होळकर यांच्या मृत्यूनंतर सुद्धा मल्हारराव होळकर हे वयाच्या 19 व्या वर्षी असताना ते इंग्रजांच्या विरोधात रणांगणात लढत होते. तुळसाबाई महाराणी यांचा मृत्यू त्या लढाईमध्ये झालेला आहे. सेटलमेंट करून होळकरांनी कधीही इंग्रजांच्या बरोबर तह केलेला नाही. होळकर इंग्रजांना घाबरतात हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलं आहे, त्याला विचारायचा आहे की, तुमच्या इतिहासाचा अभ्यास किती आहे ते पहावं लागेल. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नका असं मला नम्रपणे सांगायचं आहे, असं भूषणसिंहराजे होळकर म्हणालेत.
सातारचे छत्रपती जेव्हा अजिंक्यतारा
होळकर घराण्यातील अहिल्यादेवी यांनी सामाजिक कामे केली. जातीपातीमध्ये ते कधी अडकले नाहीत. सगळ्यांसाठी घाट बांधले विहिरी बांधल्या, बारवं बांधली. त्यांनी सगळ्या समाजासाठी केलं, कोणत्या एका समाजासाठी केलं नाही. मल्हारराव होळकर यांनी अटकेपार झेंडे लावले. प्रत्यक्षात अटकेपार झेंडे लावले त्यांच्या समाधीचे आज परिस्थिती काय आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी काल काही विषय मांडले. सातारचे छत्रपती जेव्हा अजिंक्यतारा किल्ल्यावरती कैद होते, त्यावेळी त्यांना सोडवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर यांनी पुढाकार घेतला होता. होळकर घराण्याची आणि छत्रपती घराण्याची संबंध आहेत. होळकर घराण्यातील सर्व पिढ्यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल विशेष करून शिवरायांबद्दल नेहमीच आदर बाळगलेला आहे. त्यामुळे त्याला जातीच्या वळण न लावता दोन्ही घराण्यांचे संबंध लक्षात घेता सामोपचाराची भूमिका कशी घेता येईल त्यातून मार्ग कसा काढता येईल हे पाहिजे असे ते पुढे म्हणाले आहेत.
हा कोणत्या जातीपातीचा विषय नाही तर
तुकोजी महाराजांनी या शिवसमाधीसाठी निधी दिला. त्यावेळी महात्मा फुले, टिळक किंवा तुकोजी महाराजांनी पुढाकार का घेतला त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? तर मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्यांकडे का पाहतो. त्यावेळी छत्रपती घराणं अस्तित्वात होतं, त्यांनी शिवसमाधीसाठी काय भूमिका घेतली? ही पण पहिली पाहिजे. हा कोणत्या जातीपातीचा विषय नाही तर हा शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येकाचा विषय आहे त्यामुळे याच्यात जातीपातीला आणू नका. त्यामुळे ज्या कोणत्या संघटना यामध्ये चुकीची गोष्ट मांडत असतील त्यांना समज द्यावी विशेष करून गेल्यावेळी वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत एक विषय घडला होता, तसा कुठल्याही प्रकार घडू नये हे दक्षता शासनाने घ्यावी, असंही भूषणसिंहराजे होळकर म्हणाले.
तुकोजीराव यांनी अनेक ठिकाणी निधी दिला आहे. जात पाहून निधी दिलेला नाही. एसएसपीएम महाविद्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आणि अनेक विद्यापीठासाठी देखील निधी दिला आहे. अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती यंदा होत आहे. त्याला कोणताही गालबोट लागू देऊ नये. तुकोजीराजे इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी दिली हे चुकीचं आहे, अशा प्रकारचे कोणतेही विधान खपवली जाणार नाहीत. शासनाने दोघांची मत जाणून घ्यावी आणि निर्णय द्यावा आम्ही सरकारच्या निर्णयाशी सहमत राहू. संभाजी महाराजांना विरोध नाही. मात्र या विषयांच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास करुन त्याबाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.