Pune Crime: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी संकुलात पित्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. कौटुंबीक वादातून आज सकाळी सहा वाजता युवराज अशोक सावळे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर वडिलांनी स्वतः पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
युवराज सावळे हे आई-वडील आणि मोठ्या भावासोबत मोशी संकुलात राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून युवराज लहान-लहान गोष्टीवरून आई-वडील आणि भावाशी भांडत असे. रात्री उशिरा युवराज आणि कुटुंबात पुन्हा भांडण झाले, त्यानंतर आई आणि मुलाला घरातून हाकलून देण्यात आले आणि वडील आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की वडिलांनी युवराजच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्याचा खून केला, अशी प्राथमिक माहिती आहे. हत्येनंतर वडिलांनीच भोसरी एमआयडीसी पोलिसांना घाटनेची माहिती दिली आणि आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस पथक पुढील तपास करत आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलीस
दोन घटनांनी पिंपरी-चिंचवड हादरलं
यापुर्वी आईसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुलाने संबंधित व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली होती. मृताचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याने मुलगा संतापला होता. त्यातून मुलाने हत्येचा कट रचला. निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली होती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. दीपक वाघमारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहे. मात्र खून आणि चोरीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरात अनेकदा भीतीचं वातावरण असतं. आतापर्यंत दोनवेळा मुलाने आईची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या दोन्ही घटना ताज्या असतानाच या नव्या घटनेने पिंपरी-चिंचवड हादरलं आहे.