Tanisha Bhise Death Case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील (Deenanath Mangeshkar Hospital) तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची (Tanisha Bhise Death Case) आज मेडिकल काऊन्सिल येथे सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी डॉ. सुश्रुत घैसास (Dr Sushrut Ghaisas) हे गैरहजर होते. डॉ. घैसास यांनी ई-मेलद्वारे मेडिकल काऊन्सिलला मी येऊ शकत नाही, असे कळवले. तर भिसे कुटुंबीय आजच्या सुनावणीला उपस्थित होते. त्यांनी काऊन्सिलपुढे त्यांच्या जवळ असणारे   सर्व रिपोर्ट आणि पुरावे सादर केले. तसेच भिसे कुटुंबियांनी काऊन्सिल काही महत्त्वाच्या मागण्या देखील केल्या आहेत.   

सुनावणीनंतर भिसे कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भिसे कुटुंबीय म्हणाले की,  आम्ही आज इथे हेअरिंगसाठी आलो होतो. तनिषा भिसे हिची खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल आम्ही माहिती दिली. आम्हाला पुढच्या हेअरिंगल बोलावले आहे. घैसास आले नाहीत, त्यांनी वैद्यकीय समितीला कळवलं आहे. वैद्यकीय लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करावी. शिस्तभंगाची कारवाई करावी. ट्रस्टच्या प्रशासनावर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुठल्याही कुटुंबाला अमानवीय त्रास सहन करावा लागू नये, असा मागण्या आम्ही त्यांच्यासमोर सादर केल्या आहेत.

हॉस्पिटल ट्रस्टकडून चुकीचे पुरावे दाखवले गेले

डॉ. घैसास यांना ई-मेल द्वारे कळवलं की, मे येऊ शकत नाही. आम्हाला जर पुन्हा बोलावले तर आम्ही बाजू मांडण्यासाठी आम्ही येऊ. काऊन्सिलपुढे आम्ही आमच्या जवळ असणारे,  सर्व रिपोर्ट आणि पुरावे ठेवले आहेत. हॉस्पिटल ट्रस्टकडून चुकीचे पुरावे दाखवले गेले, हे आम्हाला निदर्शनास आले आहे. त्याबाबत आम्ही आमचा अंतर्गत अहवाल सादर केला आहे. त्यावर कारवाई व्हावी. 

डॉ. घैसास यांना अटक व्हावी

डॉक्टरांनी कशी जाणूनबुजून ट्रीटमेंट दिली नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला. कौन्सिलकडून जे प्रश्न विचारले त्याला आम्ही प्रत्येक गोष्टीत पुरावे सादर केले आहे. काऊन्सिलकडून आश्वासन देण्यात आलं नाही. डॉ. घैसास यांना अटक व्हावी, ही आमची प्राथमिक मागणी आहे. आम्ही काऊन्सिलला घटनाक्रम सांगितला आहे.  

डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडला

तनिषा भिसे यांच्या आई दुर्गा रुद्रकर यांनी म्हटले आहे की, ती मुलगी माझी होती. डॉक्टरांनी केले ते योग्य नाही. आज माझ्या मुलीचा जीव गेलाय. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आहे, असे त्यांनी म्हटले. तनिषा भिसे यांच्या नणंद प्रियंका पाटील म्हणाल्या की, आम्ही सर्व पुरावे काऊन्सिलला दाखवले आहेत. आम्हाला खात्री आहे की, सत्याचा विजय होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा 

Deenanath Hospital Pune: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अन् डॉ. घैसासांवर कारवाई होणार, सरकारी पातळीवर हालचालींना वेग