Pune Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुण्यात घडामोडींना वेग आला आहे. तर मी राजीनामा देईन, असा निर्वाणीचा इशारा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला होता. पुण्यात भाजपला (BJP) शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी (NCP) आज एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. याबाबत आज पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule on Prashant Jagtap: सगळ्या कार्याकर्त्याचे मत महत्वाचे
नाराजीबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नाही, अशी नाराजी घरी चालते, पक्षात चालत नाही, समाजात काम करताना नाराजी चालत नाही. घरी नाराजी चालते, पण समाजात काम करताना अशी नाराजी चालत नाही. जगताप यांचे प्रश्न रास्त आहे, सगळ्या कार्याकर्त्याचे मत महत्वाचे आहे. ही निवडणूक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे सुळे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, पक्ष मीटिंगला आली आहे. गेले अनेक दिवस लोकसभा सेशन सुरू होतं, अनेक बिल आले आहेत, अतिशय महत्वाचे वेळी दिल्लीत होते, महापालिका निवडणूक जाहीर झाल्या याबाबत काय निर्णय घ्यायचा, ते सगळे सहकारी पुण्यात काय करायचे त्याचा आढाव घेतला आहे. आज पुण्याचा आढावा घेण्यासाठी आले आहे, आमचा माविआ आणि समविचारी पक्ष एकत्रीत येत असतील तर पुण्याच्या विकासासाठी लढावे लागेल. निवडणूक येतील जातील प्रदूषणाचे काय? २४ तास पाणी देऊ म्हटले, आज आमच्या बिल्डिंगमध्ये ही टँकर येतो, अजून पाण्याचा प्रश्न ही अनेक ठिकाणी आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे, याच तू तू मे मे करत बसणार की लढणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महात्मा गांधी यांचे बिलातून नाव काढले कशासाठी, आता मनरेगा योजना बंद केली आहे. जर आपल्या विचाराचे पक्ष एकत्रीत येऊन लढत असतील चर्चा होते. पुण्यात चांगला बदल हवा असेल तर एकत्रीत लढायला हवे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढविण्यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली आहे.