एक्स्प्लोर

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये आयोजित बैठकीत सुनेत्रा पवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. त्यासाठी, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) होत्या. त्यानंतर, डीपीडीसी बैठकीत, पुणे (Pune) जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठी शासनाने प्रस्तावित केलेल्या 1 हजार 32.88 कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण, परिवहन विकास, अपारंपारिक ऊर्जा व उर्जा, हरीत महाराष्ट्र, नागरी क्षेत्र व आरोग्य पायाभूत सुविधा, महिला व बालकांचे सशक्तीकरण, गतिमान प्रशासन, कौशल्यपुर्ण रोजगार निर्मिती, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि क्रीडा व कलागुणांचा विकासावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये आयोजित बैठकीत सुनेत्रा पवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. त्यासाठी, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, 2026-27 च्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यात मुख्यत्वाने ग्रामीण विकासासाठी 135 कोटी रुपये, परिवहन विकासासाठी 115 कोटी रुपये, नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 116.25 कोटी रुपये, अपारंपारिक ऊर्जा व उर्जा विकासासाठी 80 कोटी रुपये तसेच पर्यटन विकासासाठी 56.86 कोटी रुपये, हरीत महाराष्ट्राकरिता 40 कोटी रुपये, आरोग्य पायाभूत सुविधांचा विकासकरिता 110.71 कोटी रुपये, महिला व बालकांचे सशक्तीकरण 29.44 कोटी रुपये, गतिमान प्रशासन 78.50 कोटी रुपये, कौशल्यपुर्ण रोजगार निर्मिती 10.5 कोटी रुपये, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर 100 कोटी रुपये, क्रीडा व कलागुणांचा विकासाकरिता 10.1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अतिमागास, दुर्गम भागांना प्राधान्य

सन 2026-27 साठी शासनाने 1 हजार 32.88 कोटी रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित केली असली तरी विविध विभागांकडून एकूण 3 हजार 128 कोटी रुपयांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. त्या मागण्यांची छाननी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व प्राधान्यक्रमातील प्रकल्पांचा समावेश करण्यात येत आहे.  विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांच्या छाननीनंतर ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत लहान तुकड्यांमध्ये कामे न करता अधिकाधिक नागरिकांना लाभ देणारे मोठे व परिणामकारक प्रकल्प राबविण्यावर भर द्यावा. अतिमागास व दुर्गम भागांच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे. सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करून त्याचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सन 2025-26 साठी मंजूर 1369 कोटी रुपयांच्या सर्वसाधारण योजनेसह एकूण 1589 कोटी 46 लाख रुपयांच्या नियतव्ययाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण योजना 1369 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपायोजना 145 कोटी रुपये तसेच आदिवासी घटक कार्यक्रम 65 कोटी 46 लाख रुपये यांचा समावेश आहे. निधी वेळेत व नियोजनबद्ध खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घालून दिलेल्या शिस्त, गुणवत्ता व कालमर्यादेच्या तत्त्वांनुसार सुरू प्रकल्प दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष उपस्थितीत सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरणाद्वारे सन 2025-26 मधील खर्चाचा आढावा सादर केला. तसेच सन 2026-27 च्या प्रस्तावित प्रारूप आराखड्यात प्रामुख्याने कृषी विकास दरात व दरडोई कृषी उत्पन्नात वद्धी करण्याकरिता कृषी पुरक असणाऱ्या संलग्न क्षेत्रांच्या योजना, रास्त दर, निकोप स्पर्धा, सर्वांकरिता खुली बाजारपेठ, जलसंधारण व मृदसंधारणाची कामे, भुगर्भ पाणीसाठ्यात वाढीकरिता उपाययोजना यावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा

Pune News: पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक; कोण-कोण उपस्थित?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
Israel-Iran War Affect India: युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget