पिंपरी चिंचवड : राज्यात सत्तेत असेलेले पक्ष अनेक महानगरापालिकांमध्ये (PCMC Election 2026) स्वबळावर लढत असल्याचं चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे.(PCMC Election 2026)

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड महापालिकेत 128 पैकी 2 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा उत्साह वाढला आहे. उर्वरित 126 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. भाजपाने 120 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कमळ चिन्हावर 5 जागा लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सर्वाधिक 124 जागेवर लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 57, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 48, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13, काँग्रेसचे 45, आम आदमी पार्टीचे 35, वंचित बहुजन आघाडीचे 29 आणि बहुजन समाज पार्टीचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, अपक्ष आणि बंडखोरांची संख्या 166 आहे.तर या सर्व घडामोडींमध्ये लक्ष लागलेल्या काही टफ फाईट आहेत. (PCMC Election 2026) 

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड : प्रमुख लढती

1) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे (NCP AP) विरुद्ध उमेश खंदारे (काँग्रेस) - प्रभाग 9

Continues below advertisement

2) खासदार श्रीरंग बारणेंचे पुत्र विश्वजित बारणे (शिंदे सेना) विरुद्ध सिद्धेश्वर बारणे ( भाजप ) - प्रभाग 24

3) श्रीरंग बारणेंचे पुतणे निलेश बारणे (शिंदे सेना) विरुद्ध गणेश गुजर (अपक्ष - भाजप पुरस्कृत) - प्रभाग 24

4) विधान परिषद आमदार अमित गोरेखेंच्या आई अनुराधा गोरखे (भाजप) विरुद्ध निलिमा पवार-गायकवाड ( NCP AP ) - प्रभाग 10

5) माजी आमदार विलास लांडेंचे पुतणे विराज लांडे ( NCP AP ) विरुद्ध स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे ( भाजप ) - प्रभाग 7

6) अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे ( NCP AP ) विरुद्ध संदेश काटे ( भाजप ) - प्रभाग 28

7) भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे (भाजप) विरुद्ध उमेश काटे (  NCP AP ) - प्रभाग 28

8) चार वेळा चिंचवड विधानसभा लढलेले राहुल कलाटे (भाजप) विरुद्ध सख्खे चुलत भाऊ मयूर कलाटे ( NCP AP ) - प्रभाग 25

9) माजी महापौर माई ढोरे (भाजप) विरुद्ध शारदा सोनवणे ( अपक्ष - भाजप बंडखोर ) विरुद्ध उज्वला ढोरे (  NCP AP ) - प्रभाग 32

10) शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे ( NCP SP ) विरुद्ध संदीप कस्पटे ( भाजप ) - प्रभाग 26