पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल सप्टेंबर  (Sinhagad Road Flyover) महिन्यात ११८ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आला होता, तो आता मेट्रोच्या कामासाठी ६६ ठिकाणी तोडावा लागणार आहे. त्यासाठी २६ कोटी रुपये खर्च येणार आहे आणि पुणेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा (Sinhagad Road Flyover) सामना करावा लागणार आहे. उड्डाणपुलाच्या आणि मेट्रोच्या कामाला एकत्रित परवानगी न घेता स्वतंत्रपणे परवानग्या देण्यात आल्याने ही वेळ ओढवली आहे. (Sinhagad Road Flyover)

Continues below advertisement

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल ते फन टाईम या दोन किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. २०२१ मधे या पुलाला महापालिकेने मान्यता दिली होती. त्यावेळी या रस्त्यावर मेट्रो प्रकल्प सुरु होणार आहे का अशी विचारणा पालिकेने मेट्रोकडे केली होती. मात्र मेट्रोने त्यावेळी नकारात्मक उत्तर दिले होते. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत या मार्गावर खडकवासला पर्यंत मेट्रोला परवानगी देण्यात आली. परंतु तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु झाले होते. त्यामुळे आता मेट्रोचे खांब उड्डाणपुलाच्या मधोमध येणार असल्याने उड्डाणपुलाची रुंदी दोन्ही बाजुंनी एक मीटरने कमी होणार आहे. तरीही या पुलाच्या विद्युत रोषणाई साठी दीड कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.(Sinhagad Road Flyover)

दरम्यान, खडकवासला ते हडपसर या नियोजित मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. नियोजित मेट्रो मार्ग सिंहगड रस्त्यावरूनच जाणार असल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पमध्ये मेट्रोच्या पिलरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, उड्डाणपुलादरम्यान येणाऱ्या मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. हे कामही पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे. 

Continues below advertisement

Sinhagad Road Flyover: तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून विद्युतरोषणाई करण्याचा घाट

 सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल तोडणार हे निश्चित तरी कोट्यवधींचा खर्च का? केला असा सवाल उपस्थित झाला आहे. पुलावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून विद्युतरोषणाई करण्याचा घाट देखील घालण्यात आला आहे. मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल तब्बल ६६ ठिकाणी तोडावा लागणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने खर्चाला मंजुरी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावर नुकताच बांधून पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा पुढील काही महिन्यांत मेट्रो प्रकल्पासाठी ६६ ठिकाणी काही भाग तोडला जाणार आहे. तरी या पुलावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून विद्युतरोषणाई करण्याचा घाट विद्युत विभागाने घातला आहे. खडकवासला ते हडपसर या नियोजित मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हा मेट्रोमार्ग सिंहगड रस्त्यावरून जाणार असल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पमध्ये मेट्रो पिलरची उभारणी आधीच केली आहे. मात्र उड्डाणपुलाच्या मधल्या भागात येणाऱ्या मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल तब्बल ६६ ठिकाणी फोडावा लागणार असून हे काम पुढील काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही महापालिकेच्या विद्युत विभागाने उड्डाणपूलवरील विद्युतरोषणाईचे काम हाती घेतले आहे.