एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी संत तुकाराम महाराज संस्थान मदतीला धावले; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 लाखांची मदत, देवेंद्र फडणवीसांकडे दिला धनादेश

यंदा राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळाला, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

यंदा राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळाला, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आले, अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले. लातूर, बीड, धाराशिव ,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे राज्यातील 29 जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली. त्याचबरोबर समाजातील विविध संस्था आणि संघटनाही आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अशाच सामाजिक जबाबदारीचे आणि मानवसेवेच्या परंपरेचे पालन करत श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपये सुपूर्द केले.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी हा निधी देण्यात आला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या काळात स्वतःचा सर्व साठा गरजूंना अर्पण करून मानवतेचा जो आदर्श घालून दिला, त्याच प्रेरणेने संस्थानने हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. (Shri Sant Tukaram Maharaj Sansthan Dehu 11 lakhs donate)

संस्थानचे अध्यक्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज जालिंदर महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते. संस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, “दीनदुबळ्या आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिकवणीचे सार आहे आणि भविष्यातही सामाजिक गरजा ओळखून हे कार्य अखंडितपणे सुरू राहील...”

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 1 कोटी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली, त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना ‘श्रीं’च्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. 

हे ही वाचा -

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme: 'आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?; लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्य- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कार मिळणार
सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्य- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कार मिळणार
सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
First Superstar To Eat On Golden Platter: सोन्याच्या ताटात जेवणारा पहिला सुपरस्टार, कित्येक सुपरहिट फिल्म्सचा हिरो, पण मर्डरच्या आरोपांत जेल अन् अख्ख्या स्टारडमचा चक्काचूर
सोन्याच्या ताटात जेवणारा पहिला सुपरस्टार; पण मर्डरच्या आरोपांत जेल अन् अख्ख्या स्टारडमचा चक्काचूर
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Embed widget