Pune Parvati Crime News: पुणे जिल्ह्यातील भोरमधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृणपणे झालेली हत्या या घटनेनं (Pune Crime Bhor Nasrapur Case ) अवघा महाराष्ट्र संतापला असतानाच आता पुणे शहरातील पर्वती भागात अशीच एक हादरवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती भागामध्ये एका ७० वर्षीय व्यक्तीने आपल्याच अल्पवयीन नातीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर घटना समोर आली आहे. आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीचा आजोबा असल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे. (Pune Parvati Crime News) या घटनेतील आरोपीचे नाव देखील नाव समोर आलं आहे. पर्वती पायथ्याशी ९ वर्षीय नातीवर नराधम आजोबा कडून अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अंबादास यल्लाप्पा जाधव (वय वर्षे ७०) असे आहे.
Pune Parvati Crime News: पिडीत मुलीची आई मजुरी करत असल्याने मुलीला आजोबाकडे
घटनेनंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार पिडीत मुलीची आई मजुरी करत असल्याने मुलीला आजोबाकडे ठेवलं होतं. तर नराधम आरोपीने पोटच्या मुलीच्या मुलीवर आरोपीकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
या घटनेबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी माहिती देताना सांगितलं की, काल रात्री ९.३० वाजता एक माहिती मिळाली की, एका आरोपीला लोकांनी पकडून ठेवल होतं. ज्याने आपल्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. हा त्या मुलीचा सख्खा आजोबा आहे, जो ७० वर्षांचा आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आम्ही अटक केलेली आहे. बाळाची प्रकृती चांगली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, सध्या परिस्थिती शांत आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
Pune Parvati Crime News : पर्वतीमधील अनर्थ कसा टळला?
नराधम आजोबा आरोपीला नातू आणि नात भेटण्यासाठी आले होते. आजोबा आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं, नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढली, स्वतःच्या देखील अंगावरील कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.
Pune Parvati Crime News : नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आला. ७० वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने होणारा अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. नसरापूरनंतर आता या पर्वती भागात घडलेल्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
