पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं त्यानंतर शिवसैनिकांनी शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवत आंदोलन केलं. शिक्षण मंडळातून एका फाईलची चोरी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नाना भानगिरे यांनी केला. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमत जोरदार घोषणाबाजी देखील केली. यानंतर त्यांनी शिक्षण मंडळाकडे मोर्चा वळवला.
पुणे शहरातील अनेक विकासकामे रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते महापालिकेच्या गेटवर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
माजी आमदार रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
सर्व टेंडरमध्ये भ्रष्टाचार सुरु आहे, कोट्यवधींची उड्डाणं सुरु आहेत. आता मी सगळी माहिती घेतली, जे सुरु आहे ते पुणेकरांच्या दृष्टीनं भूषणावह नाही. कोथरुड मार्फत पैसे मुंबईला पोहोचतात, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तर, नाना भानगिरे यांनी महापालिकेच्या आयुक्तांची बदली आणि महापौरांच्या राजीनाम्याची मागणी नाना भानगिरे केली.
नाना भानगिरेंच्या नेतृत्त्वात शिक्षण मंडळाबाहेर आंदोलन
महापालिका शिक्षण मंडळात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळातून अनेक फाईल गायब झाल्या आहेत, असा आरोप शिवसैनिकांनी केली. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं.शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. आयुक्तांनी टेंडरला परवानगी दिल्यानंतर, टेंडरसाठी शिक्षण मंडळात 7 तारखेला फाईल आली. त्या दिवशी फाईल इनवर्ड झाली. त्यानंतर 2.20 वाजता फाईल चोरीला गेली. फुटेज मिळत नाही, पत्रव्यवहार मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही, असं नाना भानगिरे यांनी म्हटलं.
पुणे महापालिकेच्या त्या जागेवर शिक्षण मंडळाचं आरक्षण आहे. फाईन इनवर्ड झाल्यानंतर गायब होते. गेल्या एक वर्षापासून या फाईलचा पाठपुरावा करतोय. 7 तारखेपासून शिक्षणअधिकऱ्यांना भेटतोय, गुन्हा दाखल करा हे सांगतोय, सत्ताधाऱ्यांचं पण ते ऐकत नसलतील तर त्यांना पण रस्त्यावर उतरावं लागेल.पोलिसांकडे पत्रव्यवहार केला आहे. शिक्षण मंडळातून फाईल चोरीला जाणं पुणे महापालिकेसाठी नामुष्की आहे, असं नाना भानगिरे यांनी म्हटलं आहे.
