पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल ( MLA Disqualification Case) लागला आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला आहे. तसेच काही दिवसांवर निवडणुका देखील येईन ठेपल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पुण्यात आज संजय राऊत यांच्या मुलाखतीचे आयोजन करणार आहे. संजय राऊतांची (Sanjay Raut) ही मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे (Sushma Andhare) घेणार आहेत. या स्फोटक मुलाखतीत राऊत नेमके काय बोलणार याकडे म्हणूनच सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळयांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचे चेहरे समोर येतात. शिवसेनेची बुलुंद तोफ संजय राऊत आणि नवी मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटांवर हल्ले करत त्यांना नाकीनऊ आणले आहे. 2019 च्या सत्तानाट्य, एकनाथ शिंदेंचे बंड,या संपूर्ण काळात भाजपने अनेकप्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी सातत्याने पत्रकारपरिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने प्रत्युत्तर देऊन प्रत्येक वार पलवटून लावला. एवढच नाही तर संजय राऊत तुरूंगात असताना सुषमा अंधारेंनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आता दोन्ही नेते एकाच मंचावर येत असल्याने या मुलुखाती संदर्भात चांगलीच उत्सुकता वाढली आहे.
पुण्यात आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे घेणार आहेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमात सुषमा अंधारे संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आज पुण्यात मुलाखत रंगणार आहे.