पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol Murder)  खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे,  शरद मोहोळ खून प्रकरणात दोन नामांकित वकीलांचा सहभाग असल्याची समोर आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाने या दोघांनाही काल इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


शरद मोहोळ खून प्रकरणातील दोन आरोपी हे वकील आहेत. दोन्ही आरोपी हे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी आरपी वकिलांची नावे आहे.  पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही काल इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही वकिलांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार आहेत. शरद मोहोळ हत्या प्रकरणात या दोन वकिलांचा काय सहभाग होता? या प्रकरणात आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभग आहे का? हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे.


शरद मोहोळ हत्या प्रकरणाचे वकिल कनेक्शन


शरद मोहोळवर गोळीबार करणारे  मारेकऱ्यांनीसातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं.  मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या आठ आरोपीमध्ये या दोन वकिलांचा देखील सहभाग होता. मुख्य आरोपी देखील वकिलांकडे सुरूवात केली आहे. आरोपींना पळून जाण्यास वकिलांनी मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


शरद मोहोळच्या हत्येचा थरारक व्हिडीओ समोर


शरद मोहोळने (Sharad Mohol Case Update) त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातूव गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा अंत झाला. 


 



हे ही वाचा :


लग्नाच्या वाढदिवशी आयुष्याची दोरी कापली; शरद मोहोळ हत्या प्रकरणात आठ आरोपी अटकेत, तीन पिस्तुल आणि एक दुचाकी जप्त