पुणे/मुंबई : डिजिटल भारतात सध्या एआय म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून AI (AI) तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्येक क्षेत्रात गतीमानता आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी देखील एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये एआयचा वापर करुन ऊसाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, भारत दौऱ्यावर असलेल्या मायक्रोसॉप्ट कंपनीचे चेअरमन सत्या नंडेला यांनी बारामतीला भेट देऊन विशेष कौतुक केलंय.बारामतीमधील शेतकरी सुरेश जगताप यांनी अलीकडेच ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी, बारामती (Baramati) येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) चे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली. सत्या नाडेला (Satya nadella) यांनी या ऊस शेतीत केलेल्या प्रयोगाची दखल घेत बारामतीचं विशेष कौतुक केलं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी ट्विट करुन सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत.  


 




कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करताना उसाची लागवड बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांनी घेतली. हा यशस्वी प्रयोग एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे  केवीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने घेत, चांगल्या पद्धतीने  शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण याचा वापर करणार असल्याचे सांगितले. भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केला आहे. राज्यातील 1000 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. 


दरम्यान, 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे कृषी प्रदर्शन आयोजित आयोजित करण्यात आलं आहे. त्यामध्ये भविष्यातील शेती कशी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती केलेला ऊस आणि इतर पिके याची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत. परंतु त्याआधी अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या टीमने सत्य नडेला यांना प्रेझेंटेशन दिलं. तसेच भविष्यातील शेती कशी असेल याचा प्रात्यक्षिक बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना या प्रदर्शनादरम्यान पाहायला मिळणार आहेत. सत्या नंडेला यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केल्याने एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे सत्या नंडेला यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. त्यावर, खासदार शरद पवार यांनीही रिप्लाय करत सत्या नंडेला यांचे आभार मानले आहेत. 


सत्या नाडेलांचं ट्विट 


बारामती येथील ADT टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या AI टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत, असे ट्विट सत्या नाडेला यांनी केलं होत. त्यावर, शरद पवारांनी धन्यवाद असा रिल्पाय दिला आहे. शेतीसाठी AI चे फायदे हायलाइट करण्यासाठी आपले आभार. बारामतीमधील शेतकऱ्यांना AI चा फायदा मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ADT सह आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत Microsoft सोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. 


हेही वाचा


वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग