Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची काही आठवड्यांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घाटात फेकून देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पोलीस तपासात (Pune Crime) सर्वात मोठा खुलासा झालाय. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याचा 5 लाखांची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढलाय. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची त्यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या केली आहे. मोहिनी वाघ (Mohini Wagh) असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. काही आठवड्यांपूर्वी सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती..त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलय.. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ...
सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आतापर्यंत अटक असलेल्या आरोपींची नावे जाणून घेऊयात...
आरोपींची नाव
1. मोहिनी वाघ
2. पवनकुमार शर्मा
3. विकास शिंदे
4 . अतिश जाधव - धाराशिव
5. अक्षय जवळकर - सुपारी देण्यात आलेला व्यक्ती.
सतीश वाघ खून प्रकरणात मोठे अपडेट..
सतीश वाघ यांच्या पत्नीने दिली होती खुनाची सुपारी..
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला केली अटक..
सतीश वाघ यांचे अपहरण करून करण्यात आला होता खून..
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सापडला होता सतीश वाघ यांचा मृतदेह..
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती..
त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलय..
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ...