Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी (Warkari) चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला (Ashadhi Vari 2026) गालबोट लावणारी एक घटना आज (13 जुलै) सकाळी घडली आहे. जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 16 ते 18 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. (Jejuri Accident news)

जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने जवळपास 20 वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यापैकी एका ट्रकने मागून सात वारकऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे. या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.  (Pandharpur Ashadhi Wari) 

ट्रक ट्रॉली नांदेडची, मृत महिला वारकरी सांगलीच्या- (Pandharpur Ashadhi Wari Truck Accident) 

सदर ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी या सांगलीमधील होत्या. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत. वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायवरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची 'एबीपी माझा'ला दिली. 

3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी- रोहित पवार (Rohit Pawar On Warkari Accident)

दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले असून ते लवकर बरे व्हावेत, ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना...हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करुन पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. 

माऊलींच्या वारीत अक्रित घडलं; ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, VIDEO:

संबंधित बातमी:

Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना